LMOTY 2024: 'गोल्डन बॉय' ओजस देवतळेचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 06:44 PM2024-02-15T18:44:19+5:302024-02-15T18:45:11+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या भव्य दिव्य सोहळ्यात झाले पुरस्काराचे वितरण 

LMOTY 2024: 'Golden Boy' Ojas Deotale honored with 'Lokmat Maharashtrian of the Year' Award | LMOTY 2024: 'गोल्डन बॉय' ओजस देवतळेचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्काराने सन्मान

LMOTY 2024: 'गोल्डन बॉय' ओजस देवतळेचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्काराने सन्मान

Ojas Deotale, Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: क्रीडा, कृषी, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. आज, गुरूवारी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या भव्य दिव्य अशा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२४'च्या सोहळ्यात क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या ओजस देवतळे याला या पुरस्काराने गौरविण्यात आले. ओजस हजर न राहू शकल्याने त्याचे वडील प्रवीण देवतळे यांनी त्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.

ओजस देवतळे हा भारतीय तिरंदाजीतला गोल्डन बॉय म्हणून नावाजलेला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाउंड तिरंदाजीत देशाला तीन सुवर्णपदके जिंकून देणारा एकमेव चॅम्पियन तिरंदाज म्हणून त्याची ओळख आहे. तो सध्या सातारा येथे कला शाखेत प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. नागपूरचा २१ वर्षीय ओजस हा जागतिक तिरंदाजी क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. ओजसने तिरंदाजी विश्वचषकात भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आहे. २०१९च्या शालेय राष्ट्रीय खेळांमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याने विविध स्पर्धांमध्ये पदकांचा धडाका सुरू केला. आतापर्यंत ओजसने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आठ सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्य अशी १४ पदकांची लयलूट केली आहे. यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड होणारा ओजस नागपूर शहरातील सर्वात युवा खेळाडू होता.

यंदाच्या विजेत्यांची निवड करण्यासाठी परीक्षक मंडळ तयार करण्यात आले होते. या 'सुपर ज्युरी'मध्ये डॉ. विजय दर्डा, सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे, देवेन भारती, सोनू निगम, रमेश दमाणी, नमिता थापर, महेश काळे, डॉ. विजय भटकर, डॉ. अमित मायदेव, पोपटराव पवार, राजीव पोद्दार आणि ऋषी दर्डा यांचा समावेश होता.
 

Web Title: LMOTY 2024: 'Golden Boy' Ojas Deotale honored with 'Lokmat Maharashtrian of the Year' Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.