शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीच्या किमतीवर मर्यादा

By admin | Updated: December 30, 2014 00:59 IST

वर्षभरात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीने या व्यवसायात मंदी सुरू झाल्याचा सराफांचा दावा आहे. १ जानेवारी ते २९ डिसेंबर २०१४ या काळात काही दिवस वगळल्यास दोन्ही मूल्यवान

गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे ओढा : जागतिक पातळीवर निराशाजनक चित्रमोरेश्वर मानापुरे - नागपूर वर्षभरात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीने या व्यवसायात मंदी सुरू झाल्याचा सराफांचा दावा आहे. १ जानेवारी ते २९ डिसेंबर २०१४ या काळात काही दिवस वगळल्यास दोन्ही मूल्यवान धातूंच्या विक्रीवर बराच परिणाम झाला. देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असल्याने, या काळात नेहमी सोन्याच्या किमती सतत वाढत्या असतात. यंदा मात्र भिन्न चित्र आहे. हे काहीसे आश्चर्यकारकच आहे. वर्षात सोने २,२६० रु. तर चांदीत ६,६०० रु.ची घसरणयावर्षी सोने आणि चांदीच्या किमतीत बरीच घसरण झाली. किमतीतील चढउताराचा तक्ता पाहिल्यास यंदा १ जानेवारी २०१४ रोजी शुद्ध सोन्याचे दर २९,६१५ रुपये तर किलो चांदीचे दर ४४,२०० रुपयांवर होते. वर्ष सरताना २९ डिसेंबरला सोन्याची भावपातळी २७,३५० रुपये आणि चांदीचे दर ३७,६०० रुपयांवर स्थिरावले. तुलनात्मकरीत्या वर्षभरात सोन्याचे दर २,२६० रुपयांनी कमी झाले तर चांदीत तब्बल ६,६०० रुपयांची घसरण झाली. वर्षाची आकडेवारी पाहता यावर्षी १ मार्च २०१४ रोजी शुद्ध सोन्याचे दर ३०,७५० रुपये या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते तर चांदीने ४७,३०० रुपयांचा टप्पा गाठला होता. घसरणीचा क्रम पाहिल्यास ५ नोव्हेंबर २०१४ रोजी १० ग्रॅम सोन्याचे दर २६,०२५ रुपये आणि चांदीचे दर ३५,५०० रुपयांपर्यंतउतरले होते. यावर्षी सोन्यातील चढउतार देशातील गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे मोठ्या प्रमाणात वळल्याने झाल्याचे तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असल्याने अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदारांचे पाय सोन्यातील गुंतवणुकीकडे वळतात. गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीऐवजी रोखे किंवा समभागात गुंतवणूक करण्यासाठी पावले उचलली आहेत. यामुळे सोन्याची मागणी कमी होत चालली आहे.किमती घसरण्याची शक्यता कमीसोन्यातील गुंतवणुकीच्या किमतीच्या वाढीचा बहर आता संपला असून, यापुढे सोन्याच्या किमतीच्या वाढीला अनेक मर्यादा असल्याचे सराफा व्यापाऱ्यांचे मत आहे. सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरतील, ही शक्यता सध्या तरी कमी वाटते. सध्या झाकोळलेली सोन्याची ही स्थिती हंगामी ठरावी, असेच दिसते. अर्थात सोन्याबाबत निराशाजनक चित्र जागतिक पातळीवर असले तरीही सोने खरेदीत भारत व चीन या दोन देशांतील नागरिकांनी आपली आघाडी कायम राखली आहे. उलट सोन्याच्या किमती घटल्यास या दोन देशांत सोन्याची खरेदी वाढेल, असा अंदाज आहे.भारतातील खरेदी ही जगात सर्वाधिक असली तरीही सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे लंडनच्या सोने-चांदी बाजारात ठरतात. त्यामुळे सोन्याच्या किमतीमागे बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत.