शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जाऊ गणपतींच्या गावाला!, एकवीस मंदिरांतील एकवीस बाप्पांचे दर्शन घेऊ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 03:15 IST

प्रभादेवीचे श्रीसिद्धिविनायक मंदिर लक्ष्मण विठू पटेल यांनी १९ नोव्हेंबर १८०१ रोजी पूर्ण केले असे म्हटले आहे. प्रभादेवीच्या श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती अतिशय प्रसन्न असून ती उजव्या सोंडेची आहे.

१. प्रभादेवीचा श्रीसिद्धिविनायक : प्रभादेवीचे श्रीसिद्धिविनायक मंदिर लक्ष्मण विठू पटेल यांनी १९ नोव्हेंबर १८०१ रोजी पूर्ण केले असे म्हटले आहे. प्रभादेवीच्या श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती अतिशय प्रसन्न असून ती उजव्या सोंडेची आहे. मूर्ती सुमारे अडीच फूट उंचीची असून तिला चार हात आहेत. मूर्तीच्या माथ्यावर मुकुट असून गळ्यात नागाचे जानवे आहे. श्रीगणपतीच्या बाजूला ऋद्धिसिद्धी आहेत.२. बोरीवलीचा स्वयंभू श्रीगणेश : बोरीवली पश्चिम येथे लोकमान्य टिळक रस्त्यावर वजिरा गावठाण आहे. तेथे स्वयंभू गणेशाचे हे मंदिर आहे. या मंदिराजवळच एक सुंदर सरोवर आहे.३. फडके गणपती : इसवी सन १८६५ मध्ये अलिबाग येथील गोविंद गंगाधर फडके यांनी मुंबईत विठ्ठलभाई पटेल रस्त्यावर एक जागा घेतली आणि तेथे त्यांनी हे गणेश मंदिर बांधले.४. गोरेगावचा संकल्पसिद्धी गणेश : मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथे संकल्पसिद्धी गणेशाचे मंदिर आहे. दरवर्षी माघ महिन्यातील संकष्टला मंदिरात मोठा उत्सव असतो.५. टिटवाळ्याचा महागणपती : टिटवाळ्यापासून जवळच्या वासुदरी येथे पेशव्यांनी एक तलाव बांधून घेतला. त्या तलावाच्या दुरुस्तीचे काम चालू असताना एक गणेशमूर्ती सापडली. पेशव्यांना रात्री दृष्टांत झाला होता. पेशव्यांनी तलावाच्या बाजूला मंदिर बांधले.६. अणजूर येथील श्रीसिद्धिविनायक : ठाण्याहून भिवंडीकडे जाताना अणजूर या गावी जाण्यासाठी रस्ता लागतो. इतिहासप्रसिद्ध गंगाजी नाईक यांच्या वाड्यातील माडीवर ही गणेशमूर्ती आहे.७. दिगंबर श्रीसिद्धिविनायक : कर्जत तालुक्यातील कडाव या गावी गणपतीची बरीच मोठी मूर्ती आहे. ही मूर्ती यज्ञोपवितधारी आहे. ही मूर्ती फार प्राचीन असून हिची स्थापना कण्व ऋषींनी केली आहे.८. चिंचवडचा मंगलमूर्ती : प्रसिद्ध गणेशभक्त मोरया यांनी चिंचवड येथे श्रीमंगलमूर्तीची स्थापना केली. मोरया गोसावी यांनी तेथेच जिवंत समाधी घेतली. येथील नाणे 'चिंचवडचा रुपया' म्हणून प्रसिद्ध होता. वाड्यातील मंगलमूर्ती ही मोरया गोसावी यांना मोरगाव येथे मिळालेली प्रासादिक मूर्ती आहे.९. कसबा गणपती : पुण्यामधील कसबा गणपती फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी कसबा गणपतीची मूर्ती लहान होती. परंतु सतत शेंदूर लावीत गेल्याने ही मूर्ती मोठी झाल्याचे जाणकार सांगतात.१०. सारसबागेतील गणपती : पुण्यामध्ये पेशवे उद्यानानजीक असलेल्या सारसबाग तळ्यात सिद्धिविनायक हे प्रसिद्ध देवस्थान आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती संगमरवराची आहे.११. दशभुज गणपती : पुण्याला पर्वतीजवळच चिंतामणीनगरात दशभुज चिंतामणीचे एक मंदिर आहे. मूर्तीच्या कपाळावर ॐकार आहे. मूर्ती त्रिनेत्री आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे. मूर्तीला दहा हात आहेत. मूर्तीची उंची दोन फूट असून रंग तांबूस आहे. या गणपतीला नर्मदेश्वर असेही म्हणतात.१२. श्रीशिवाजीस्थापित गणपती : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अंबवडे गावी छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे. अंबवडे येथे पोहोचल्यावर धूळगंगा ओढ्यावरचा झुलता पूल ओलांडून गेल्यावर शंकरजी नारायण यांच्या समाधीजवळच उतरून गेल्यावर ही मूर्ती आहे.१३. पुळ्याचा गणपती : कोकणात समुद्रकिनाºयावर गणपतीपुळे येथे स्वयंभू गणेशाचे प्रसिद्ध मंदिर आहे. रत्नागिरीपासून १९ किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी येथे येऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले होते. येथे संपूर्ण टेकडी गणपती मानली जाते. या मंदिराचा घुमट छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे एक प्रधान अण्णाजी दत्तो यांनी बांधला.१४. हेदवीचा लक्ष्मीगणेश : चिपळूणजवळ हेदवी येथे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे. ही मूर्ती काश्मीर येथे तयार केली असल्याचे सांगण्यात येते. पेशवेकालीन कोळकर स्वामींना ही मूर्ती पेशव्यांकडून मिळाली, असेही सांगण्यात येते.१५. उफराटा गणपती : चिपळूण तालुक्यात गुहागर येथे उफराटा गणपतीची दोन-अडीच फूट उंचीची ही मूर्ती आहे. गावातील कोळी बांधवांना ही मूर्ती सापडल्याचेही सांगण्यात येते.१६. परशुराम गणेश : चिपळूणजवळ परशुराम येथे उजव्या सोंडेची संगमरवरी पाषाणाची ही सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना १८७५ साली झाल्याचा उल्लेख सापडतो.१७. कड्यावरचा गणपती : रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले गावी हे गणेश मंदिर आहे. इसवी सन १८७४ मध्ये हे मंदिर बांधण्यात आले.१८. नांदगावचा श्रीसिद्धिविनायक : ग्रहलाघव ग्रंथाचे कर्ते गणेश दैवज्ञ हे या सिद्धिविनायकाचे भक्त होते. मुरूडजवळच सागरकिनारी हे सुंदर मंदिर आहे.१९.कनकेश्वरचा श्रीरामसिद्धिविनायक : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात कनकेश्वर येथे हे मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार फूट उंचीवर अतिशय सुंदर परिसरात हे मंदिर आहे. येथे जाण्यासाठी सुमारे साडेसातशे पायºया चढाव्या लागतात.२०. उरणचा श्रीसिद्धिविनायक : पनवेल तालुक्यातील उरणजवळ विनायक नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात सुमारे ९०० वर्षांपूर्वी हंबीरराजाच्या काळातील हे मंदिर आहे. मंदिर चिरेबंदी आहे. थोरले माधवराव पेशव्यांनी या मंदिरास भेट दिली होती.२१. सांगलीचा गणपती : सांगलीचा गणपती प्रसिद्ध आहे. काळ्या पाषाणाचे हे मंदिर अतिशय सुंदर आहे. गणेशमूर्ती मोठी आहे. बाजारपेठेत रस्त्यावर उभे राहूनही मूर्तीचे दर्शन घेता येते.- दा. कृ. सोमण,पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव