शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाईन’ शाळेबरोबर हे ‘ऑफलाईन’ शिकणंही चालू राहू दे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 03:38 IST

‘ऑफलाईन’ शिकताना : पुस्तकापलीकडचं शिक्षणही खूप मोठं असतं; ‘ऑनलाईन’ शाळेबरोबर हे ‘ऑफलाईन’ शिकणंही चालू राहू दे...

- शुभांगी चेतनस्वयंपाकाची गडबड चालू असताना मुलं पायात घोटाळतातच. मी अमुक करतो, तमूक करतो, मला पोळी करायला दे, मला भाजी करायला दे.. कणीक हातात घेऊन गोळे करायची तर कोण आवड! मी अशावेळी कधीही मुलांना हटकून लांब पाठवलं नाही. आमचा पिटुकला मीरही मिसळणाच्या डब्यातले पदार्थ ओळखू लागलाय. गोड्या मसाल्यापासून सगळं बरं! भावाचा किचनसेट त्याच्या ताब्यात आहे. स्मित सातव्या वर्षापासून पिठलं करतो. त्याला आवडतं ते करायला. काय काळजी घ्यायची सांगितल्यावर मुलं नीट करतात सगळं. लॉकडाऊनमध्ये त्याला नवं काहीतरी करायचं होतं. म्हणाला, ‘मी भजी करतो.’ त्यानं ती रेसिपी वाचली होती. मात्र, प्रत्यक्षात करताना बरेच बदल झाले. तूर, मूग, चणा अशा मिक्स डाळी समप्रमाणात काढून त्यानं त्या पाच-सहा तास भिजत ठेवल्या. वाटल्या. मिरची वाटून घातली; पण म्हणाला, तिखटपण चालतं बरं का मिरची नको असली तर! हिंग, हळदीबरोबर जिरेपूड, धनेपूड अ‍ॅड करूया, चांगलं लागेल म्हणाला. विनाबेसनपीठ त्यानं भजी केली. बढिया झाली. रणवीर ब्रारच्या रेसिपी मन लावून बघतो तो. त्याला म्हटलं, बघ तर, रणवीर आवडतो याचं कारण काही रेसिपी छान असते एवढंच नसतं. तो गोष्ट खूप छान सांगतो.

- तर स्मित गोष्टींचा विचार करतोय. आता येते त्याच्या किचनसेटकडे. आम्हाला दोन्ही मुलगे असले तरी त्यांच्या खेळण्यांचा भाग त्यांचा लाडका किचनसेट आहे. तिथं खेळता खेळता आता ते स्वयंपाकघरात शिरलेत. असाच परवा शेजारचा मुलगा आला नि म्हणाला, ‘कुणाचा हा किचनसेट?’ स्मित म्हणाला, आधी माझा होता, आता मीरचा झालाय! तो मुलगा म्हणाला, ‘अरे, हा मुलींचा खेळ असतो. त्याच स्वयंपाक करतात!’ यावर स्मित म्हणाला, ‘असं काही नसतं. आमची आई म्हणते, ज्याला भूक लागते, त्याला स्वयंपाक करता यायला हवा!’ मला अगदीच कळलं की, आपल्या वागण्यातून मुलं अर्थ लावतात. कधी कधी मुद्दाम एखादी गोष्ट शब्दांत सांगावी लागत नाही, वेळ पडते तेव्हा त्यांची तीच गोष्ट तयार करतात, वाढवतही नेतात... म्हणून तर म्हणतेय मी, की आपली मुलं आता घरूनच शिकणार आहेत काही दिवस, तर त्यांना पुस्तकाच्या पलीकडचं काही ‘आॅफलाईन’ शिक्षणही देऊया आपण!(लेखिका, चित्रकार आणि दोन मुलांची आई आहे.)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइनEducationशिक्षण