शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेचे राजकारण रंगणार

By admin | Updated: October 27, 2014 02:47 IST

विधानसभेतील संख्याबळाच्या निमित्ताने सत्ताकारणाची जोरदार चर्चा सध्या सुरू असताना विधान परिषदेचे राजकारणही येत्या काळात रंगण्याची शक्यता आहे

यदु जोशी, मुंबईविधानसभेतील संख्याबळाच्या निमित्ताने सत्ताकारणाची जोरदार चर्चा सध्या सुरू असताना विधान परिषदेचे राजकारणही येत्या काळात रंगण्याची शक्यता आहे. भाजपाची राज्यात सत्ता येणार असली तरी वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेत ते अल्पमतात आहेत. त्यामुळे ज्येष्ठ सभागृहात भाजपाला बरीच कसरत करावी लागणार आहे. विधान परिषदेत सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादीचे, त्याखालोखाल काँग्रेसचे आहेत. भाजपा तिसऱ्या क्रमांकावर असली तरी त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये १० सदस्य संख्येचा फरक आहे. शिवसेनेबरोबर भाजपाने सत्ता स्थापन केली तर विधानसभेत त्यांना कुठलीही अडचण नाही. मात्र विधान परिषदेत युतीतील दोन्ही पक्षांचे मिळून तावडे, शेलार वगळल्यानंतर केवळ १५ सदस्य असतील. विधानसभेपेक्षाही भाजपाची जास्त कोंडी परिषदेत होऊ शकते. ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ करताना भाजपाची कसोटी लागेल.भाजपाने उद्या स्वबळावर सरकार बनविले तर परिषदेतील ९ सदस्य आणि ७ अपक्षांपैकी आपल्या समर्थक आमदारांना हाताशी धरून पुढे जाणे भाजपासाठी आणखीच कठीण असेल. अशावेळी सरकार स्थापनेसाठी भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊ करणाऱ्या राष्ट्रवादीने हीच भूमिका विधान परिषदेतही घेतली तर भाजपासाठी तो मोठा दिलासा ठरेल. विधान परिषदेत विधेयक नामंजूर झाले तर ते विधानसभेत पुन्हा आणून सरकारला मंजूर करवून घेता येते. मात्र विधान परिषदेतील नव्या सरकारचे अल्पमत लक्षात घेता सरकारवर तांत्रिक पराभवाची नामुश्की वारंवार ओढवू शकते.लगेच नाही, पण काही महिन्यांनंतर एकदा सरकारला संख्याबळाच्या दृष्टीने स्थैर्य आले की विधान परिषदेचे सभापतिपद आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. त्यासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली जाण्याची शक्यता आहे.