शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषद एकत्रच

By admin | Updated: October 16, 2015 03:16 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. विधानपरिषदेच्या जानेवारीत रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी कोणती रणनिती आखायची याची चर्चा या बैठकीत झाली

अतुल कुलकर्णी,मुंबईकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. विधानपरिषदेच्या जानेवारीत रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी कोणती रणनिती आखायची याची चर्चा या बैठकीत झाली. एकत्र लढल्यास फायदा होईल ,असा सूर त्यात निघाला. आजची बैठक प्राथमिक स्वरुपाची होती. सविस्तर मतदारसंघ निहाय बैठक लवकरच घेतली जाईल,असे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. एकत्र लढल्याचा फायदा नक्कीच होईल, त्यामुळेच आम्ही आज बैठक घेतली व एकमत केले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.मुंबईतून भाई जगताप (काँग्रेस), रामदास कदम (शिवसेना), धुळे-नंदूरबारमधून अंबरीश पटेल (काँग्रेस), कोल्हापूरहून महादेवराव महाडिक (काँग्रेस), नागपूरहून राजेंद्र मुळक (काँग्रेस), सोलापूरहून दिपक साळुंके (राष्ट्रवादी), अकोला-वाशिम-बुलडाणाहून गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) आणि अहमदनगरहून अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी) अशा आठ जणांची मुदत जानेवारीत संपणार आहे. त्यासाठी डिसेंबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. सध्या या सगळ्या स्थानिक प्राधिकरणांमध्ये कोणत्या पक्षाचे किती बलाबल आहे याचीही चर्चा यावेळी झाली. शिवसेनेच्या दोन, राष्ट्रवादीच्या दोन आणि काँग्रेसच्या चार जागा सध्या आहेत. तर व्यवस्थित नियोजन केले आणि भाजपा शिवसेना दुहीचा फायदा घेतला तर आपण चांगल्या जागा निवडूण आणू शकतो अशी चर्चाही यावेळी झाली.