शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेत कोंडी कायम

By admin | Updated: March 17, 2017 01:10 IST

शेतकरी कर्जमाफीवरून विधान परिषदेतील कोंडी अद्याप कायम आहे. एकीकडे सरकार चर्चा आणि बैठकांचा मार्ग सांगत आहे तर विरोधक मात्र ताबडतोब कर्जमाफी जाहीर

मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून विधान परिषदेतील कोंडी अद्याप कायम आहे. एकीकडे सरकार चर्चा आणि बैठकांचा मार्ग सांगत आहे तर विरोधक मात्र ताबडतोब कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीवर अडून बसल्याने गुरुवारीदेखील सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. कालच बीड, लातूर आणि परभणी आदी भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेले असताना सरकार कर्जमाफीबाबत चकार शब्द काढत नाही. अद्याप कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नाही, नवीन कर्ज नाही त्यामुळे शेतकरी वर्ग समूळ नष्ट व्हावा, असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सरकारसमोर केवळ उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असल्याचे विधान केल्याचा आरोप काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी केला. तर, स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये’ असे विधान केल्याचे सांगून भट्टाचार्य यांच्या विधानावर आक्षेप घेतला. १ लाख ४० हजार कोटींचे उद्योगपतींचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध का, असा सवाल काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी केला. यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजीला सुरुवात केली. या गोंधळातच सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी असल्याने हा निर्णय घाईघाईत घेता येणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व गटनेत्यांसोबत बैठक घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री सभागृहात निवेदनही करणार आहेत, त्यामुळे कामकाज चालू द्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले. त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरुवातीला १ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. (प्रतिनिधी)गदारोळातच अशासकीय विधेयके सादर कामकाज पुन्हा सुरू झाले तरीही विरोधक आपल्या मागणीवर ठाम होते. सभापतींनी कामकाज सुरळीत चालविण्याचा प्रयत्न केला. अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करतानाच पुरवणी मागण्या संमत करणे आवश्यक असल्याचे म्हटले. मात्र, विरोधकांनी कर्जमाफीशिवाय कसलेच कामकाज होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या गदारोळातच सभापतींनी अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर केल्याची घोषणा केली. तर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या ज्या आवाजी मतांनी संमत करण्यात आल्याची घोषणा सभापतींनी केली. त्यानंतर गदारोळातच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्याची घोषणा केली.