शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हवाहवासा वाटणारा नेता!

By admin | Updated: June 4, 2014 01:03 IST

कोणत्या शब्दांत मी माङया भावना व्यक्त करू़़़ शब्दच सुचत नाहीत. एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता आज मराठवाडय़ाने, राज्याने आणि देशाने गमावला आहे.

राजेंद्र दर्डा
कोणत्या शब्दांत मी माङया भावना व्यक्त करू़़़ शब्दच सुचत नाहीत. एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता आज मराठवाडय़ाने, राज्याने आणि देशाने गमावला आहे. राजनबाबू, मी तर तुमच्या परिवाराचाच असं सांगून खांद्यावर हात टाकून जेव्हा ते काही बोलायचे तेव्हा खरोखरच ते माङया परिवारातले एक ज्येष्ठ सदस्य झालेले असायचे. कोणी टीका करू देत अथवा काहीही म्हणू देत कधीही, कोणाला काय वाटेल याची फिकीर न करता बिनधास्त वागणारे ते लोकनेता होते. 
आमच्याच मराठवाडय़ाचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्या दोघांची भाषणांमधील जुगलबंदी असो किंवा खाजगी मैफिलीत रंगणा:या कोटय़ा असोत, ते दोघे सगळी मैफील, सभा ताब्यात घ्यायचे. विधानसभेत देखील भाषणाला उभे राहिले की अनेकांचे कान त्यांच्याकडे असायचे. सभागृह स्वत:च्या भाषणाने ते असे काही ताब्यात घ्यायचे की सगळ्यांना ते बोलत राहावे, असे वाटत असे. बोलताना ते टोप्या उडवायचे, चिमटे काढायचे, पण कधी कोणाला जखमी करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. तरीही ते स्वत:चा मुद्दा मात्र काही केल्या सोडायचे नाहीत. 
ग्रामीण महाराष्ट्र त्यांना तळहातावरच्या रेषेइतका स्पष्ट माहिती होता. इथले नेते, त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण, त्यांचे दोष लख्ख माहिती असलेला हा नेता असा अचानक धक्का देऊन सगळ्यांना सोडून जाईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. ‘तुम्ही चांगलं काम करताय’ असे सांगणारे दिलदार गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने माझी व्यक्तिगत देखील मोठी हानी झाली आहे. ज्या विधानसभेने त्यांची घणाघाती भाषणो ऐकली तेच सभागृह आज असे शोकसंतप्त झालेले पाहून माङयाही भावना दाटून आल्या. 
मागच्या पावसाळी अधिवेशनाचे दिवस होते. मी माङया दालनात शिक्षण विभागाचे काही अधिकारी, आमदार यांच्यासोबत चर्चा करीत बसलो होतो. चर्चा सुरूअसताना अचानक दरवाजा उघडून ‘काय म्हणताय राजनबाबू..’ असे म्हणत गोपीनाथ मुंडे आत आले. ‘साहेब, आपण..’ असे म्हणत मी त्यांचे स्वागत केले. मला म्हणाले, ‘हा माङया मतदारसंघातला माणूस आहे. त्याचं काम आहे तुमच्या शिक्षण विभागात.. काम झालंच पाहिजे..’ आणि मग काही वेळ त्यांनी गप्पाही मारल्या. कोठेही  मोठेपणाचा आव नाही, पण त्याचवेळी   सामान्यातल्या सामान्य कार्यकत्र्यासाठी, मतदारसंघातल्या छोटय़ा माणसासाठी ते माङयार्पयत आले. वास्तविक ते फोनही करू शकले असते. या त्यांच्या अशा स्वभावामुळेच ते जनमानसात लोकनेता म्हणून नावलौकिक मिळवू शकले. अशा या नेत्यास मी माङया, मतदारसंघाच्या आणि परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करीत आहे. 
(लेखक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत़)