शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीला क्लीन चिट

By admin | Updated: April 11, 2015 04:15 IST

भाजपा-शिवसेनेच्या सरकारने आज गेल्या १० वर्षांतील आघाडी सरकारच्या आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका विधिमंडळात मांडताना कोणत्याही वित्तीय अनियमिततांवर बोट ठेवले नाही. तसेच, महसुली उत्पन्नातील वाढ

यदु जोशी, मुंबई -भाजपा-शिवसेनेच्या सरकारने आज गेल्या १० वर्षांतील आघाडी सरकारच्या आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका विधिमंडळात मांडताना कोणत्याही वित्तीय अनियमिततांवर बोट ठेवले नाही. तसेच, महसुली उत्पन्नातील वाढ इतर प्रगत राज्यांशी तुलना करता समतुल्य आणि समाधानकारक असल्याची पावतीही देऊन टाकली आहे!१९९९मध्ये युतीचे सरकार जाऊन आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन वित्त मंत्री जयंत पाटील यांनी युती सरकारच्या कारभाराची चिरफाड करणारी श्वेतपत्रिका काढली होती. आज जाहीर झालेल्या श्वेतपत्रिकेत मात्र अशी कोणतीही चिरफाड दिसत नाही. मात्र, राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने नव्या सरकारचा भर कशावर राहील, हे अधोरेखित करण्यात आले आहे. श्वेतपत्रिकेत म्हटले आहे की, गेल्या १० वर्षांत राज्याच्या महसुली उत्पन्नाचे सकल उत्पादनाशी असलेले प्रमाण ९.९ टक्के ते १०.७ टक्के दरम्यान राहिले. तसेच राज्याचा महसूल वार्षिक १६ टक्के या दराने वाढला. या दोन्ही बाबी सर्वसाधारणपणे इतर प्रगत राज्यांशी तुलना करता समाधानकारक आहेत. राज्याच्या उत्पन्नात केंद्रीय साहाय्यक अनुदानाचा वाटा १२.९ टक्क्यांहून  १७ टक्के (११ हजार २०३ कोटींवरून ३० हजार ६५९ कोटी) इतका वाढला, असे नमूद करताना या काळात सत्तेत असलेल्या यूपीए सरकारचे एकप्रकारे कौतुकच केले आहे. राज्यावरील कर्ज २००४ मध्ये १ लाख ९ हजार १६७ कोटी रुपये होते. पुढील दहा वर्षांत ते ३ लाख २ हजार ५७८ कोटी रुपये इतके झाले. ही वाढ लक्षणीय असली तरी राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत संचित कर्ज गेल्या दहा वर्षांत २६६ टक्क्यांवरून १६७.४ टक्के पर्यंत कमी झाले. दरवर्षीची निव्वळ राजकोषीय तूटसुद्धा राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत (२००९-१० चा अपवाद वगळता) गेल्या पाच वर्षांत ३ टक्के मर्यादेच्या आत राहिली, असे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. राज्याच्या महसुलात झालेली वाढ समाधानकारक असली तरी महसुली खर्चातही त्याच प्रमाणात किंबहुना काहीशा जास्त दराने वाढ झाली आहे. परिणामी, राज्यास महसुली संतुलन टिकविता आलेली नाही, ही अत्यंत चिंतेची बाब असल्याची एकमेव थेट टीका श्वेतपत्रिकेत आहे. या शिवाय, गेल्या दहा वर्षांत घेतलेल्या १ लाख ९३ हजार ४११ कोटी रुपयांच्या कर्जापैकी १८ हजार ३०४ कोटी रुपये महसुली खर्चासाठी वापरण्यात आले. महसुली खर्च वाढल्याने भांडवली खर्च मर्यादित झाला. परिणामी, राज्याच्या अर्थव्यस्थेस चालना देणारी दीर्घकालिन टिकणारी मत्ता आवश्यक त्या प्रमाणात तयार करता आली नाही. साधने मर्यादित असली तरी राज्याच्या वार्षिक योजनांचे नियोजन मर्यादित ठेवले नाही, असा दोषारोपही करण्यात आला आहे.