शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:49 IST

Maharashtra Assembly Elections 2024: या पक्षाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची तुलना शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग यांच्याशी केली आहे. 

Maharashtra Assembly Elections 2024: मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच एका पक्षाचे अजब विधान समोर आले आहे. या पक्षाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. तसेच, या पक्षाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची तुलना शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग यांच्याशी केली आहे. 

लॉरेन्स बिश्नोईला एका राजकीय पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. उत्तर भारतीय विकास सेनेने (UBVS) लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा निवडणुकीची ही ऑफर दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याबाबत लॉरेन्स बिश्नोईला पत्रही लिहिले आहे. याशिवाय, लॉरेन्स बिश्नोईला विजयी करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रयत्न करतील, असे पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मुंबई विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेच्या ४ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या मंजुरीनंतर आणखी ५० उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी आपल्या निवेदनात सांगितले. तसेच, ते पुढे म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोईमध्ये आपण शहीद भगतसिंग पाहतो.

याचबरोबर, लॉरेन्स बिश्नोईला लिहिलेल्या पत्रात सुनील शुक्ला यांनी म्हटले आहे की, "तुम्ही पंजाबमध्ये जन्मलेले उत्तर भारतीय आहात याचा आम्हाला अभिमान आहे. आमचा उत्तर भारतीय विकास सेना या नावाने राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. आमचा पक्ष जो देशात उत्तर भारतीयांच्या हक्कांसाठी काम करतो."

बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे नावराष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले आहे. तसेच, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, मुंबई पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारणvidhan sabhaविधानसभा