शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू

By admin | Updated: December 2, 2014 00:14 IST

विनोद तावडे : चर्चा करून शैक्षणिक धोरण ठरविणार

कणकवली : शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेईन आणि मग राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवेन, असे सांगून राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भ्रष्टाचारामुळे यातील बरेचसे कर्ज झाले आहे. आम्ही आहोत तर भ्रष्टाचार होणार नाही आणि विकासही गतिमान होईल. त्यामुळे हे कर्ज येत्या अडीच वर्षांत फेडणे शक्य होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. जानवली येथील वृंदावन मंगल कार्यालयात संस्था प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे, राजन तेली, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष एस. टी. सावंत, हरेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयदेव कदम, चारुदत्त देसाई, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, डॉ. अभय सावंत, उपस्थित होते. तावडे म्हणाले, आधीच्या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांनी आता थोडा धीर धरावा. आम्हाला थोडा वेळ द्यावा, आम्ही शेतकऱ्यांचे चित्र बदलू. दुष्काळी भागात अजित पवारांचे दौरे सुरू असून, त्या भागासाठी कर्ज देण्याची मागणी करत आहेत. मंत्री असताना ते कधी या भागात दिसले नाहीत. सिंधुदुर्गाच्या मातीने अनेकांना मोठे केलं. आम्हाला ज्या मातीने मोठे केले. त्या मातीला कधीच विसरणार नाही. सिंधुदुर्गाचे प्रश्न आपलेपणाने सोडवेन. मंत्रिपदाचा लालदिवा असला तरी कधीही आपल्यामध्ये अंतर पडणार नाही, असे तावडे म्हणाले.विविध संस्थांसमवेत गटचर्चाकार्यक्रम १२.४५ वाजता सुरू झाला. कार्यक्रमात शिक्षणमंत्री तावडे यांचे एकट्याचे भाषण झाले. त्यानंतर तावडे यांनी व्यासपीठावरून खाली येत संस्था प्रतिनिधींच्या गटांशी वेगवेगळी चर्चा केली आणि निवेदने स्वीकारली. स्वच्छतागृहांअभावी शाळा सोडतातराज्यातील शिक्षणक्षेत्राची माहिती घेताना धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सातवीनंतर मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातील ५ टक्के मुली शेतीच्या कामांसाठी म्हणून शाळा सोडतात, पण ९५ टक्के मुली स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने शाळा सोडतात. स्वच्छतागृहांअभावी मुलींना योग्यप्रकारे स्वच्छता ठेवता येत नाही. त्यांना विविध आजाराला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पालक शिक्षण सोड, पण जीव वाचव, असे सांगून शाळा सोडायला लावतात.