शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मयूरेशला मायणीकरांचा अखेरचा निरोप

By admin | Updated: February 4, 2015 01:51 IST

खेळाडू मयूरेश भगवान पवार याच्यावर चाँद नदीच्या तीरावरील कैलास स्मशानभूमीमध्ये मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मायणी (जि. सातारा) : मायणी, ता. खटाव येथील राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू मयूरेश भगवान पवार याच्यावर चाँद नदीच्या तीरावरील कैलास स्मशानभूमीमध्ये मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परिसरातील हजारो ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. तिरुवअनंतपुरम् (केरळ) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मयूरेशचे सोमवारी निधन झाले. त्याचे पार्थिव आज मायणी येथे आणण्यात आले. राज्य नेटबॉल असोसिएशनतर्फे केरळ येथे नेटबॉल स्पर्धेसाठी मयूरेश महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत होता.केरळ येथून मंगळवारी ११ वाजून ४० मिनिटांनी मयूरेशचे पार्थिव विमानाने मुंबई येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आदरांजली वाहिली. तेथून रुग्णवाहिकेतून पार्थिव मायणी येथे सायंकाळी ७.२५ला आणण्यात आले. चाँद नदीच्या काठावर मयूरेशचे घर असल्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंस तसेच मराठी शाळा आणि चांदणी चौकामध्ये दिवसभर मयूरेशच्या पार्थिवाची वाट पाहत हजारो ग्रामस्थ, क्रीडापे्रमी व मित्रमंडळी वाट पाहत होते. कैलास स्मशानभूमीच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली होती. अंत्यविधीस आमदार जयकुमार गोरे, सुरेंद्र गुदगे, तहसीलदार विवेक साळुंखे, क्रीडाधिकारी उदय जोशी, सुधाकर कुबेर, डॉ. एम.आर. देशमुख आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व मायणी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)