शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

ललित मोदी भेटीने मारिया अडचणीत

By admin | Updated: June 21, 2015 01:22 IST

वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन येथे जुलै २०१४ मध्ये ललित मोदीना भेटल्याची बाब उजेडात

मुंबई : वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन येथे जुलै २०१४ मध्ये ललित मोदीना भेटल्याची बाब उजेडात आल्याने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) भुवय्या उंचावल्या आहेत. ईडी ललित मोदी यांच्याविरुद्ध १६ गुन्ह्यांप्रकरणी चौकशी करीत असताना मारिया-ललित भेटीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.ललित मोदी यांच्याविरुद्ध चौकशी चालू असताना त्यांची पोलिस आयुक्त भेट कशी घेऊ शकतात? वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या दृष्टीने हे निश्चित चांगले वर्तन नाही, असे ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकरणावर खुलासा करताना राकेश मारिया यांनी सांगितले की, एका कॉन्फरन्ससाठी लंडनला गेलो असता मोदींचे वकील मला भेटले. लंडनमध्ये मोदी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जीवास धोका आहे, त्याअनुषंगाने ललित मोदी यांना तुम्हांला भेटायचे आहे, असे मोदींच्या वकिलाने सांगितले. तेव्हा मी मोदी यांची भेटली घेतली; परंतु, अत्यंत थोड्या वेळासाठी असे मारिया यांनी सांगितले. लंडन हे काही मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. भारतात येऊन तक्रार दाखल करा, असे मी त्यांना सांगितले. मुंबई पोलिसांना या प्रकरणी चौकशी करता यावी म्हणून मोदींनी मुंबईला परतणे जरुरी आहे, असे मी मोदी आणि त्यांच्या वकिलांना सांगितले. आमची ही भेट अवघ्या १५ ते २० मिनिटाची होती, असे मारिया यांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.लंडनहून मुंबईला परतल्यानंतर मी याबाबत तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही माहिती दिली असल्याचे मारिया यांनी सांगितले. गुन्हे विभागाचा सह-आयुक्त असताना आम्ही ललित मोदींवर हल्ला करण्याचा मुंबई अंडरवर्ल्डचा डाव उधळून लावला होता.