लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा निधी कधी? आदिती तटकरे म्हणाल्या, "तशी घोषणा आम्ही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:28 IST2025-03-05T16:27:10+5:302025-03-05T16:28:03+5:30
राज्यात सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. आता या योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा निधी कधी? आदिती तटकरे म्हणाल्या, "तशी घोषणा आम्ही..."
Ladki Bahin Yojana: राज्यात पुन्हा सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. पण, आता या योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात 2100 रुपये मिळतील, अशी घोषणाच आम्ही केली नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेद्वारे 2100 रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही, असे वक्तव्य महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी केले आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे ?
आज अधिवेशनात आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. येत्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात 2100 रुपये देऊ, असे कोणतेही वक्तव्य आम्ही केले नव्हते. सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो. या अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 4, 2025
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.
७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा… pic.twitter.com/37HlfDfPWF
या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबाबतची घोषणा होण्याची शक्यता होती. राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणी या 2100 रुपयांची वाट पाहत होत्या, मात्र आदिती तटकरेंच्या वक्तव्याने राज्यातील लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे. दरम्यान, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक चांगली बातमीही आदिती तटकरेंनी दिली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 पैसे एकत्र खात्यात येणार आहेत.