केवायसीसाठी नेटवर्क नाही, मग ‘बहिणी’ सातपुडा पर्वत चढून घेतात सिग्नलचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:38 IST2025-10-11T09:38:36+5:302025-10-11T09:38:44+5:30
विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून डोंगराची वाट चढल्यानंतरही मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही.

केवायसीसाठी नेटवर्क नाही, मग ‘बहिणी’ सातपुडा पर्वत चढून घेतात सिग्नलचा शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव (जि. नंदुरबार) : तालुक्याच्या नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावात महिलांना सध्या दररोज डोंगरावर चढाई करावी लागत आहे. ही चढाई पाणी किंवा सरपणासाठी नव्हे, तर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर अर्ज भरुन केवायसी करता यावी यासाठी आहे.
विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून डोंगराची वाट चढल्यानंतरही मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे केवायसी करता यावी यासाठी महिलांना तासन् तास डोंगरावर ऊन, वारा पाऊस झेलत बसावे लागत आहे. सातपुड्याच्या अनेक गावांत इंटरनेट सेवा नसल्याने माता-बहिणींवर ही स्थिती ओढावली आहे.