२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:03 IST2025-05-06T07:03:35+5:302025-05-06T07:03:51+5:30

Ladki Bahin Yojana: माझ्या खात्याकडे ३ हजार कोटींचे दायित्व आहे. अशा वेळी खाते चालवणे मुश्कील होईल. - शिरसाट

Ladki Bahin Yojana: Impossible to give Rs 2100 to beloved sisters! Sanjay Shirsat angry at Ajit Pawar for cutting funds | २१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना दिली जाणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणे शक्य नसल्याची प्रांजळ कबुली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना  दिली.

वित्त विभागाने गेल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय, तसेच  आदिवासी विकास विभागाचा अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग केला. त्यावरून शिरसाट यांनी संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविण्यास ठाम विरोध करत ते म्हणाले, फेब्रुवारीत जेव्हा लाडक्या बहिणींसाठी  निधी कपात करण्याबाबतची फाइल माझ्याकडे आली होती, तेव्हा आपण निधी कपात करू नये, असा स्पष्ट अभिप्राय दिला होता. माझ्या खात्याकडे ३ हजार कोटींचे दायित्व आहे. अशा वेळी खाते चालवणे मुश्कील होईल.

पैसे आभाळातून आणणार का?
कोल्हापूर : लाडकी बहीण ही लोकप्रिय योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला पैसे देताना अर्थ विभागाची ओढाताण होते. त्याचा कमी-अधिक परिणाम सर्वच विभागांवर झाला आहे, हे संजय शिरसाट यांनी समजून घेतले पाहिजे.

Web Title: Ladki Bahin Yojana: Impossible to give Rs 2100 to beloved sisters! Sanjay Shirsat angry at Ajit Pawar for cutting funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.