शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी प्रकरण : वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद

By admin | Updated: July 21, 2016 15:01 IST

कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या केल्याच्या घटनेच्या निषधार्थ मराठा व बहुजन समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

आॅनलाईन लोकमतऔरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या केल्याच्या घटनेच्या निषधार्थ मराठा व बहुजन समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. बजाजनगर, सिडको, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेणपूंजी, पंढरपूर, वाळूज या भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी रुग्णालय, मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता शाळा-महाविद्यालयासह संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नेहमी गर्दीने फुलेल्या मुख्य चौक, रस्त्यावर शुकशुकाट होता.

अहमदनगर जिल्यातील कोपर्डी गावात चार नराधमानी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या केली. संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा राज्यभर निषेध करण्यात करुन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली गेली. या क्रुर घटनेच्या निषेधार्थ मराठा व बहुजन समाजातर्फे गुरुवार २१ रोजी वाळूज महानगर बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या बंदला गुरुवारी वाळूज परिसरातील शाळा-महाविद्यालय, व्यापारी, व्यवसायिक यांनी आपले सर्व कामकाज बंद ठेवून उत्सफु र्त प्रतिसाद दिला.

बजाजनगर, सिडको, रांजणगाव शेणपूंजी, पंढरपूर, वाळूज या भागात तर सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. तर जोगेश्वरी, तीसगाव, साजापूर, आदि भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

सकाळी ८ वाजता नितिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगर, सिडको, पंढरपूर, रांजणगाव शेणपूजी, वडगाव कोल्हाटी भागात वाहन रॅली काढून सर्वाना बंदचे आवाहन करण्यात आले.