शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये टोलने केला भाजपाचा घात!

By admin | Updated: November 3, 2015 02:33 IST

तीन पक्षांतून कुटुंबातील तिघे राजकारण करणारे आमदार महादेवराव महाडिक शहाणे की कोल्हापूरची जनता, असा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला होता. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत

- विश्वास पाटील (कोल्हापूर विश्लेषण)तीन पक्षांतून कुटुंबातील तिघे राजकारण करणारे आमदार महादेवराव महाडिक शहाणे की कोल्हापूरची जनता, असा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला होता. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत जनतेने दोन्ही काँग्रेसकडे सत्ता सोपवून महाडिक यांच्या राजकारणाला चपराक दिली. शिवाय, त्यांची संगत करणाऱ्या भाजपालाही फटकारले. पक्षीय निष्ठा, राजकीय बांधिलकी गुंडाळून ठेवून तुम्ही रोज एक भूमिका घेणार असाल, तर जनता अद्दल घडविल्याशिवाय राहत नाही, याची चुणूक दाखविणारा हा निकाल आहे.कोल्हापूर महापालिका निवडणुकीत टोलच्या प्रश्नाने भाजपाचा पुरता घात केल्याने, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखण्यात बाजी मारली. ही निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी ठरली होती. भाजपा-शिवसेनेच्या राज्यस्तरीय संबंधावर परिणाम करणारी निवडणूक म्हणूनही तिच्याकडे पाहिले गेले. कारण याच निवडणुकीच्या प्रचारात या दोन सत्तेतल्या पक्षांनी एकमेकांना शड्डू ठोकले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या या निवडणुकीत मुख्यत: भाजपाचे भवितव्य पणाला लागले होते, परंतु मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मर्यादित यश टाकले. शिवसेनेचा दारुण पराभव झाला. या पक्षाला कशाबशा चारच जागा मिळाल्या. ‘शिवसेनेपेक्षा जास्त जिंकायचे’ भाजपाचे स्वप्न साकार झाले, तरी त्यांना महापालिकेवर मात्र सत्तेचे कमळ फुलविता आले नाही. विधानसभा निवडणुकीत जे लोकमानस होते, तेच वर्षभरानंतर कायम आहे का, याचीही लिटमस टेस्ट म्हणून या निकालाकडे पाहिले गेले, परंतु त्यामध्ये भाजपाचा त्या वेळेचा जनाधार कमी झाल्याचे निकालाने दाखवून दिले. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे, त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. भाजपाने काही मटकेवाले, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनाही उमेदवारी दिली. साधनशुचितेचा आव आणणारा पक्ष सत्तेसाठी कोणालाही मिठ्या मारतो, असे चित्र त्यातून लोकांना पाहायला मिळाले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देऊन काँग्रेसला सर्वाधिक जागा जिंकून दिल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपाही त्यांनी या निकालाने काढला. काँग्रेसच्या राजकारणात महाडिक व सतेज पाटील यांच्यातील संघर्षाची धारही या लढतीला होती. त्यात सतेज यांनी बाजी मारली असून, त्यांचे यापुढील टार्गेट आता महाडिक यांची विधान परिषदेची निवडणूक असणार हेदेखील निश्चित झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेल्या टोलने विधानसभेला सतेज पाटील यांचा पराभव केला, परंतु तोच टोल रद्द करण्याचे आश्वासन देऊनही भाजपाचा पराभव वाचवू शकला नाही. राज्य सरकारने दिलेले आश्वासन मतदारांना भुरळ घालू शकले नाही. विधानसभा निवडणुकीत १०पैकी ६ जागा शिवसेनेला आणि प्रत्येकी २ भाजपा व राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची स्थिती काय राहणार? याबद्दल लोकांत उत्सुकता होती, परंतु या निवडणुकीने काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकल्याचे चित्र शहरात दिसले. शिवसेनेला मर्यादित यश मिळाले. पक्षाचे चारच नगरसेवक होते, तेवढेच या वेळेलाही निवडून आले. ताकदीच्या उमेदवारांची वानवा, संघटनात्मक पाया नाही आणि आर्थिक बळ कमी पडल्याने शिवसेना पराभूत झाली. मतदारांनी प्रस्थापित उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. पैशांचा प्रचंड वापर झाला, तरीही मतदारांनी ज्यांना निवडून द्यायचे आहे, त्यांनाच मतदान केल्याचेही निकालावरून दिसले.