Kolhapur North By Election Result: तीन विरुद्ध पाच! कोल्हापुरात कदमांची खडतर वाट; काँग्रेस सुस्साट, भाजपची पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 11:23 AM2022-04-16T11:23:30+5:302022-04-16T11:29:11+5:30

Kolhapur North By Election Result: सलग पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक मतं; आघाडी १५ हजारांच्या घरात

Kolhapur North By Election Result congress candidate jayshree jadhav gets big lead against bjp leader satyajit kadam | Kolhapur North By Election Result: तीन विरुद्ध पाच! कोल्हापुरात कदमांची खडतर वाट; काँग्रेस सुस्साट, भाजपची पिछेहाट

Kolhapur North By Election Result: तीन विरुद्ध पाच! कोल्हापुरात कदमांची खडतर वाट; काँग्रेस सुस्साट, भाजपची पिछेहाट

googlenewsNext

कोल्हापूर: काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक झाली. आज याठिकाणी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी घेणाऱ्या काँग्रेसनं १३ व्या फेरीनंतरही आघाडी टिकवली आहे. आठव्या, नवव्या आणि दहाव्या फेऱ्यांमध्ये भाजपनं अधिक मतं घेतली. मात्र त्यानंतरच्या पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसला जास्त मतं पडली आहेत.

सातव्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव साडे नऊ हजारपेक्षा अधिक मतांना आघाडीवर होत्या. त्यानंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये भाजपच्या सत्यजीत कदम यांना अधिक मतं मिळाली. त्यामुळे जाधवांचं मताधिक्य ८ हजारांवर आलं आहे. मात्र त्यानंतरच्या पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी सुस्साट कामगिरी केली. आता त्यांच्याकडे जवळपास १५ हजारांचं मताधिक्य आहे.

अकरावी फेरी
जयश्री जाधव 2870 मतं
सत्यजित कदम 2756 मतं
ही फेरी लीड 114
काँग्रेसच्या जयश्री जाधव एकूण लीड  8187

बारावी फेरी
जयश्री जाधव:  3946 मतं
सत्यजित कदम:  2908 मतं
या फेरीतील लीड:  1038
फेरी अखेर एकूण लीड:  9225

तेरावी फेरी
जयश्री जाधव 4386 मतं
सत्यजित कदम 2432 मतं
ही फेरी लीड 1964
काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचे एकूण लीड 11179 

चौदावी फेरी
जयश्री जाधव: 3756 मतं
सत्यजित कदम:  2669 मतं
या फेरीतील लीड:  1087
फेरी अखेर एकूण लीड:  12,266

Web Title: Kolhapur North By Election Result congress candidate jayshree jadhav gets big lead against bjp leader satyajit kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.