"केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची चौकशी करा’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 14:36 IST2024-08-09T14:33:17+5:302024-08-09T14:36:30+5:30
Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृह या ऐतिहासिक वास्तूला आगीची झळ पोहचली असल्याने या दुर्घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

"केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची चौकशी करा’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई - ऐतिहासिक वारसा असलेल्या 'केशवराव भोसले नाट्यगृहाला काल भयंकर आग लागली. यात वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूला आगीची झळ पोहचली असल्याने या दुर्घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ऐतिहासिक परंपरा लाभलेलं 'केशवराव भोसले नाट्यगृहाला काल भयंकर आग लागली. कोल्हापूरकरांचा हा सांस्कृतिक वारसा आहे, हा वारसा असा राख होताना बघणे हे भावनेला धक्का लागणारे आहे. या आगीत नाट्यगृहाचे, मौल्यवान गोष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढले पाहिजे, कोल्हापूरकरांचा हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सगळे प्रयत्न केले पाहिजे.