शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

दरडोई निव्वळ उत्पन्नात कोल्हापूरची भरारी; राज्यात टॉप टेनमध्ये समावेश

By भीमगोंड देसाई | Updated: March 9, 2026 12:21 IST

महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे : शेती उत्पादन, संपर्क यंत्रणा सक्षम झाल्याने सकारात्मक परिणाम

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : राज्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नाच्या यादीत कोल्हापूर जिल्हा टॉप टेनमध्ये आला आहे. राज्यात पहिल्या क्रमांकावर मुंबई, तर सहाव्या क्रमांकावर कोल्हापूर आहे. राज्यात सर्वांत कमी उत्पन्नाचा जिल्हा नंदूरबार आहे. दरम्यान, पुणे विभागात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय कोल्हापूरचे दरडोई उत्पन्न सन २०२३-२४च्या तुलनेत सन २०२४-२५ मध्ये ३५ हजार २६३ रुपयांनी वाढले आहे. जिल्ह्यातील औद्योगिक, कृषी, दुग्धव्यवसाय, सेवा क्षेत्रातील सातत्यामुळे उत्पन्नवाढीचा वेग कोल्हापूरने कायम ठेवला आहे.

राज्य शासनाचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नात सन २०२१-२२ च्या तुलनेत सन २०२४-२५ मध्ये १ लाख १ हजार ८०८, तर पुण्याची १ लाख ३३ हजार ८१७ रुपयांची वाढ झाली आहे.

साखर उद्योग, दुग्धव्यवसाय, लघू आणि मध्यम उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे. शहर आणि परिसरात विकसित झालेल्या औद्योगिक वसाहती, उद्योगांचा विस्तार, फाउंड्री हब, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योग, हुपरीतील चांदी व्यवसाय, इचलकरंजीतील वस्त्रोद्याेग, बांधकाम क्षेत्राचा विस्तार, व्यापार क्षेत्रामुळे जिल्ह्याच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

सन २०२४-२५ मधील राज्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नातील जिल्हे अनुक्रमे कंसात उत्पन्नाची आकडेवारी अशी :

मुंंबई (५१७८७५) , ठाणे (४४४२८३), पुणे (४२६७२०), नागपूर (३६७८०५), रायगड (३५७५८१), कोल्हापूर (३२४४४४), सांगली (३०४२३३), नाशिक (३००२६०), सोलापूर (२८९५५८), छत्रपती संभाजीनगर (२७९९३०).

...तर ‘कोल्हापूर नंबर वन’वर

पुणे विभागात पाच जिल्हे येतात. निव्वळ दरडाेई उत्पन्नात पुणे एक नंबरला, तर कोल्हापूर निव्वळ दरडोई उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विभाग आणि राज्यात मेट्रो, काॅर्पोरेट आणि बहुउद्देशीय कंपन्या असलेली शहरे दरडोई उत्पन्नात आघाडीवर आहेत, याची उणीव कोल्हापूर जिल्ह्यात दिसते.

मोठे उद्योग, दळणवळणाच्या सुविधा चांगल्या असतील तर रोजगारनिर्मिती वाढते. दरडोई उत्पन्नात भर पडते. कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात संपर्काच्या यंत्रणा सक्षम झाल्या आहेत. शेतीआधारित उद्योग वाढत आहेत, आदी कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या निव्वळ दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. कोल्हापुरात एखादी मोठी बहुउद्देशीय कॉर्पोरेट कंपनी आली तर पुन्हा कोल्हापूरचे स्थान राज्यात वर असेल. - विजय ककडे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Net Per Capita Income Soars, Enters State's Top Ten

Web Summary : Kolhapur's net per capita income surged, securing a spot in Maharashtra's top ten. Driven by industry, agriculture, and dairy, it saw a significant rise from 2023-24 to 2024-25, placing it second in the Pune division.