शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

मारेकरीच बनला फिर्यादी

By admin | Updated: June 7, 2015 01:45 IST

चोरीतील पैशांच्या वाटणीवरून तरुणाने तब्बल १८ वार करून मित्राची निर्घृण हत्या केली. तसेच हा गुन्हा दडविण्यासाठी स्वत:च फिर्यादी बनला.

मनीषा म्हात्रे,  मुंबईचोरीतील पैशांच्या वाटणीवरून तरुणाने तब्बल १८ वार करून मित्राची निर्घृण हत्या केली. तसेच हा गुन्हा दडविण्यासाठी स्वत:च फिर्यादी बनला. मात्र देवनार पोलिसांनी त्याचे बिंग फोडले आणि त्याला अटक केली. हसीन अन्सारी (१९) असे आरोपीचे नाव आहे. तर अकबर लहरी असे यामध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. १ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महाराष्ट्र नगर येथे १९ वर्षांच्या तरुणाच्या हत्येची माहिती देवनार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लहरी आणि अन्सारीला रुग्णालयात दाखल केले. अन्सारीला फिर्यादी करून घेतले. दरम्यान, अन्सारीने दिलेल्या माहितीत तफावत जाणवल्याने वरीष्ठ पोलीस निरिक्षक मुनीरखान इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे गुलाबराव पाटील, सपोनी विजय अंबेरके आणि त्यांच्या तपास पथकाने अन्सारीच्या दिशेने उलट तपास सुरु केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतेवेळी अन्सारीने लिफ्ट कोसळून अपघातात जखमी झाल्याची खोटी माहीती दिल्याचे समोर आले. त्याने सांगितलेल्या सुरक्षा रक्षकाच्या माहितीत घटनेच्या दिवशी मृतदेहाशेजारी असलेल्या अन्सारीला त्याने थांबण्यास सांगितले होते. मात्र असे असतानाही अन्सारीने घटनास्थळाहून पळ काढला. अन्सारीच्या माहितीवरून बनविण्यात आलेल्या आरोपीच्या छायाचित्रातील तरुणाचा सुगावाही पोलिसांनी लावला.त्याला अन्सारी समोर उभे करताच त्याची बोबडी वळली. आणि आपण यात फसलो याची जाणीव होताच अन्सारीने आपल्याची गुन्हा कबुली दिली. नेमके काय झाले?व्यसनासाठी लूटमार करून ते पैसे उकळत होते. २६ मे रोजी दोघांनी एका बिहारी तरुणाला लुटले. त्यातून चार हजार रुपये मिळाले. ठरल्याप्रमाणे ते पैसे दोघांमध्ये वाटून घेण्यासाठी १ जूनच्या रात्री ते एकत्र जमले होते. दोघेही दारू आणि गांजाची नशा करून महाराष्ट्र नगरच्या मैदानात आले. अशात लहरीने केवळ ५०० रुपये देऊन अन्सारीला भागवून घ्यायला सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. जाताना रागाच्या भरात चाकूने त्याने अन्सारीवर हल्ला चढविला. अन्सारीने नशेच्या आवेगात त्याच्या हातातील चाकू घेऊन लहरीवर वार करून हत्या केली.