शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीनेच केला काशीरामचा खून

By admin | Updated: May 23, 2014 01:11 IST

जिल्ह्यातील देव्हाडी येथील काशीराम कुकडे याच्या खून प्रकरणावरून पडदा उठला आहे. त्याचा खून पत्नी, मोठा मुलगा आणि साळ्याने मिळून केल्याचे तपासात आढळून आले आहे.

साळा, मोठा मुलगाही अटकेत: बंद घरात सापडलेले मानवी अवशेष काशीरामचेच

तुमसर (जि. भंडारा) : जिल्ह्यातील देव्हाडी येथील काशीराम कुकडे याच्या खून प्रकरणावरून पडदा उठला आहे. त्याचा खून पत्नी, मोठा मुलगा आणि साळ्याने मिळून केल्याचे तपासात आढळून आले आहे. निर्जन परिसरातील बंद घराच्या जमिनीमध्ये पुरण्यात आलेल्या मृतदेहाचे अवशेष सापडल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी तपासाची चके्र फिरवून काशीरामची फरार पत्नी शीला कुकडे हिला मध्य प्रदेशातील रायपूर येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान महिला पोलीस कर्मचार्‍यांनी तिला पोलिसी हिसका दाखविताच तिने गुरुवारी सकाळी आपला भाऊ मोतीराम बुद्धे आणि मोठा मुलगा संतोष कुकडे यांच्या मदतीने फेब्रुवारी २०१३ मध्ये फावड्याने पती काशीरामचा खून केल्याची कबुली दिली आहे. देव्हाडी येथील तलाव परिसरातील रहिवासी काशीराम कुकडे याचा १५ महिन्यांपूर्वी घरात खून करण्यात आला. घरातच खड्डा खोदून तेथे त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. तेव्हापासून त्या घरात कुणीही राहात नव्हते. आठ दिवसांपूर्वी ते घर खचल्यावर कुत्री त्यातील सामान बाहेर आणत होते. मंगळवारी गावकर्‍यांनी घरात डोकावून पाहिल्यावर त्यांना मोठा खड्डा दिसला. पोलिसांनी तो खड्डा खोदला तर त्यात मानवी हाडे सापडली. काशीराम कुकडे हा बेलदारी कामे करायचा. त्याचे २० वर्षांपूर्वी खैरलांजी येथील शीला बुद्धे हिचेशी लग्न झाले होते. त्यावेळी तो देव्हाडी गावात राहायचा. काही वर्षे सुखाचा संसार सुरू असतानाच त्यांच्यात भांडणे सुरू झाली. त्यानंतर त्यांनी गावातील तलाव परिसरातील आपल्या शेतात लहानसे घर बांधून तेथे राहू लागले. तरीसुद्धा भांडणे सुरूच होती. या नेहमीच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी पत्नी शीलाने कट रचला. तत्पूर्वी तिने लहान मुलगा सूरजला सामान आणण्यासाठी बाहेर पाठविले. त्यानंतर तिने आपला भाऊ मोतीराम बुद्धे व मोठा मुलगा संतोष यांच्या मदतीने काशीरामवर फावड्याने वार केले. त्यात काशीरामचा मृत्यू झाला. लहान मुलगा घरी परत येईपर्यंत त्यांनी घरातच दोन फुटाचा खड्डा खोदून त्यात काशीरामचा मृतदेह पुरला. माती भुसभुशीत असल्यामुळे तासाभरात मृतदेहाची विल्हेवाट लावली. दुसर्‍या दिवशी शीला आपला भाऊ मोतीराम बुद्धे याच्याकडे खैरलांजी येथे राहण्यासाठी गेली. अधूनमधून ती देव्हाडीत येऊन घराच्या परिसरात फेरफटका मारत होती. घर तलाव परिसरात असल्यामुळे दलदल असून केव्हाही पडण्याची भीती होती. त्यामुळे घरात पुरलेल्या काशीरामच्या मृतदेहाची अन्यत्र विल्हेवाट लावण्याची योजना मोतीराम व शीलाने आखली. जून २०१३ मध्ये पावसाळ्यापूर्वी शीला, मोतीराम व संतोषने जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी सांगाडा तेवढा शिल्लक होता. त्यांनी सांगाडा बाहेर काढून मातीने खड्डा बुजविला. तो सांगाडा पोत्यात भरून ते खैरलांजीला गेले. त्यानंतरही हाताची दोन हाडे आणि पंजाची हाडे मातीत फसून राहिली होती. दरम्यान, घरात खड्डा दिसल्यावर गावकर्‍यांनीच पोलिसात तक्रार केली. खड्ड्यात सापडलेली हाडे मानवाची असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर ही हाडे आणि काशीरामचा लहान मुलगा सूरजच्या रक्ताचे नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले. या कालावधीत पोलिसांनी काशीरामच्या पत्नीचा शोध घेतला असता, ती रायपूरला मुलीकडे राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तुमसर पोलिसांचे पथक रायपूरकडे रवाना झाले. रायपूरमध्ये तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ती पोलिसांना टाळाटाळीचे उत्तरे देत होती. या प्रकरणी मेहुणा मोतीराम बुद्धे व मोठा मुलगा संतोष कुकडे यांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात भादंवि ३०२ (खून करणे), २०१ (पुरावा नष्ट करणे) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काशीरामच्या खुनामागील कारणे आणि त्याच्या मृतदेहाच्या अन्य अवशेषाची विल्हेवाट कुठे लावली, या दिशेने पोलिसांनी तपास केंद्रित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)