शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

‘पत्त्यांचा बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो’, KDMCतील घडामोडींवरून भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:22 IST

Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026 Result: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदेसेनेनेला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सर्वच पक्षांनी महापौरांच्या निवडीसह इतर पदांच्या निवडणुकीसाठी संख्याबळाची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये यावेळी भाजपा आणि शिंदेसेनेची महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती अशा लढती झाल्या होत्या. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीने  महायुतीला कडवी टक्कर दिली होती. मात्र आता मुंबई जवळच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदेसेनेनेला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

या संदर्भात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात उपाध्ये लिहितात की, महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागून जेमतेम चार दिवस झाले आहे.  महाराष्ट्राच्या हिताकरता दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच, तिकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने  उद्धवसेनेची साथ सोडलीच, उबाठाच्या नगरसेवकांनीही ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. पत्त्यांचा बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो, असे केशव उपाध्ये म्हणाले. 

दरम्यान, आज सकाळपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर कल्याण-डोंबिवलीमधील शिंदेसेनेचे ५३ नगरसेवक हे गट नोंदणीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यांच्यासोबत मनसेचेही ५ नगरसेवक होते. एवढंच नाही तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP mocks Uddhav Thackeray as alliance falters in Kalyan-Dombivli elections.

Web Summary : Following municipal election results, political shifts occur as MNS supports Shinde's Sena in Kalyan-Dombivli. BJP's Keshav Upadhye criticizes Uddhav Thackeray, stating his alliance is weaker than a house of cards.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Shiv SenaशिवसेनाMNSमनसेBJPभाजपा