शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्यातील जखमी पोलिसांना न्याय

By admin | Updated: October 14, 2015 03:57 IST

२६/११च्या हल्ल्यात पोलिसांनी बजाविलेल्या शौर्याचे नेहमी गोडवे गाणाऱ्या राज्य सरकारला या घटनेत जखमी झालेल्या १८ अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तब्बल ६ वर्षे आणि ११ महिन्यांनी मायेचा पाझर फुटला आहे.

जमीर काझी, मुंबई२६/११च्या हल्ल्यात पोलिसांनी बजाविलेल्या शौर्याचे नेहमी गोडवे गाणाऱ्या राज्य सरकारला या घटनेत जखमी झालेल्या १८ अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तब्बल ६ वर्षे आणि ११ महिन्यांनी मायेचा पाझर फुटला आहे. अपुऱ्या शस्त्रांनिशी जिवाची पर्वा न करता अतिरेक्यांशी लढताना गंभीर जखमी झाल्याने औषधोपचारासाठी व्यतित झालेला त्यांच्या कालावधीची रजा अखेर विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश गृह विभागाकडून नुकतेच बजावण्यात आले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत प्रवेश केला होता. त्यांचा प्रतिकार करताना मुंबई पोलीस दलातील १८ अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पूर्ववत होऊन ड्युटीवर पुन्हा हजर होण्यासाठी अनेकांना कित्येक महिन्यांचा कालावधी लागला. प्रशासनाने त्यांच्या अनुपस्थितीचे दिवस अर्जित रजेमधून कपात केले होते. उपचारासाठी व्यतित केलेला कालावधी विशेष रजा म्हणून गृहीत धरावा, अर्जित रजेमधून तो कालावधी वगळू नये, अशी मागणी या जखमींकडून वारंवार होत होती. मुंबईचे तत्कालीन आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी त्याबाबत ३ नोव्हेंबर २०१३ रोजी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला आता दोन वर्षांचा अवधी होत आला असताना विशेष रजेची मागणी मंजूर केली आहे. २६/११ ही सामान्य घटना नाही, त्यामुळे या घटनेत जखमी झालेल्या १८ अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा गैरहजर कालावधी हा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१मधील नियम ७७ (१) बीनुसार विशेष रजा म्हणून समजण्यात येईल, असे त्याबाबत काढलेल्या आदेशात म्हटले आहे. (त्या वेळचे पद व कंसात त्यांच्या अनुपस्थितीचे दिवस)हवालदार मधुकर झोले (६२), कॉन्स्टेबल बाळू मोरे (१०७), कॉन्स्टेबल शंकर पवार (३५), नाईक अरुण जाधव (१८०), कॉन्स्टेबल शंकर व्हंडे (३३८), कॉन्स्टेबल अमित खेतले (६६), कॉन्स्टेबल सचिन टिळेकर (८८), सहायक निरीक्षक विजय पोवार (७२), हवालदार मोहन शिंदे (१५४), कॉन्स्टेबल विनायक दंगव्हाळ (१५), निरीक्षक दीपक ढोले (९७), निरीक्षक नितीन काकडे (६९), नाईक निवृत्ती गव्हाणे (१८३), नाईक अशोक पवार (१२५), कॉन्स्टेबल सौदागर शिंदे (३०), नाईक प्रवीण सावंत (२८७), सहायक निरीक्षक संजय गोविलकर (४), सहायक निरीक्षक विजय शिंदे (१८१)