शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ गांधीवादी चुन्नीभाई वैद्य यांचे निधन

By admin | Updated: December 20, 2014 03:15 IST

ज्येष्ठ गांधीवादी आणि ‘आधुनिक विनोबा’ अशी ओळख असणारे चुन्नीभाई वैद्य यांचे शुक्रवारी पहाटे अहमदाबाद येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

मुंबई : ज्येष्ठ गांधीवादी आणि ‘आधुनिक विनोबा’ अशी ओळख असणारे चुन्नीभाई वैद्य यांचे शुक्रवारी पहाटे अहमदाबाद येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मानसकन्या नीताबेन आणि त्यांचे पती महादेव विद्रोही आहेत. त्यांच्या पार्थिवावर अहमदाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. आसाममधील जंगल आणि खेड्यात सर्वोदयी साहित्य रुजविण्याच्या कामापासून त्यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ केला. गावाची जमीन गावाची, नाही कुणा सरकारची या आंदोलनाचे ते प्रणेते होते. वाराणसी येथे त्यांनी बारा वर्षे सर्वोदयी साहित्य प्रकाशन सांभाळले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनादरम्यान आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिपुत्र मासिकाचे संपादन केले. ३५२ पेक्षा अधिक गावांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून त्यांनी आंदोलन केले. विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर काम करत त्यांनी गरीब शेतकरी वर्गाला जमीन मिळवून देण्यासाठी सरकारशी दोन हात केले. म्हणून त्यांना ‘आधुनिक विनोबा’ या नावाने संबोधत. त्यांच्या ‘असेसिनेशन आॅफ गांधी : फॅक्ट अ‍ॅण्ड फॉल्सहूड’ या पुस्तकाचा अकरा भाषांत अनुवाद झाला असून, शेवटच्या क्षणापर्यंत गोरगरिबांसाठी ते कार्यरत राहिले. (प्रतिनिधी)