पत्नीला जीन्स, कुर्ता नाकारणो ही क्रूरताच

By Admin | Updated: June 29, 2014 02:48 IST2014-06-29T02:48:01+5:302014-06-29T02:48:01+5:30

पत्नीला जीन्स व कुर्ता घालण्यास मनाई करून केवळ साडी नेसण्यासाठी दबाव टाकणो ही एक प्रकारची क्रूरताच असल्याचा निर्वाळा कुटुंब न्यायालयाने दिला आहे.

Jeans and kurta rejection of wife are cruelty only | पत्नीला जीन्स, कुर्ता नाकारणो ही क्रूरताच

पत्नीला जीन्स, कुर्ता नाकारणो ही क्रूरताच

>कुटुंब न्यायालयाचा निर्वाळा : साडी नेसण्याच्या दबावावरून दिला घटस्फोट
मुंबई : पत्नीला जीन्स व कुर्ता घालण्यास मनाई करून केवळ साडी नेसण्यासाठी दबाव टाकणो ही एक प्रकारची क्रूरताच असल्याचा निर्वाळा कुटुंब न्यायालयाने दिला आहे.
मुंबईतील एका जोडप्याचा घटस्फोट न्यायालयाने या कारणावरून मंजूर केला. यासाठी पत्नीने न्यायालयात धाव घेतली होती. विवाहानंतर पती कपडे खरेदी करीत नव्हता. त्यामुळे आपण स्वत:हून जीन्स व कुर्ता दैनंदिन वापरासाठी घेतला. पण त्याला विरोध करत पतीने साडी नेसण्याचा हट्ट धरला. तसेच पतीचे कुटुंबीय  माहेरहून एक लाख रुपये आणण्याची सक्ती करत होते. त्यामुळे अशा पतीपासून विभक्त होण्याची इच्छा असून, माझा घटस्फोट मंजूर करावा, अशी विनंती पत्नीने न्यायालयाकडे केली होती. 
विशेष म्हणजे, पैसे आणण्यासाठी माहेरी पाठविल्यानंतर पती एकदाही भेटायला आला नाही किंवा सासरी परत येण्यासाठी त्याने कधीही विनंती केली नाही. याउलट, पती अश्लील एसएमएस करून त्रस देत असल्याचा आरोपही पत्नीने केला होता. न्यायालयाने हे सर्व मुद्दे ग्राह्य धरत घटस्फोट मंजूर केला. तसेच, घटस्फोटासाठी अर्ज करण्याकरिता आलेल्या खर्चाची भरपाई म्हणून पत्नीला 5 हजार रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने पतीला दिले. (प्रतिनिधी)
 
पैसे आणण्यासाठी छळ
पतीचे कुटुंबीय माहेरहून एक लाख रुपये आणण्याची सक्ती करत होते, अशीही तक्रार या महिलेने केली आहे. त्यामुळे अशा पतीपासून विभक्त होण्याची इच्छा असून, माझा घटस्फोट मंजूर करावा, अशी विनंती तिने केली होती. 

Web Title: Jeans and kurta rejection of wife are cruelty only