Jayant Patil: 'राष्ट्रवादी नवऱ्याच्या अन् शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत', सुजय विखेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 20:08 IST2022-03-28T19:59:31+5:302022-03-28T20:08:13+5:30
Jayant Patil: 'कुठल्याही आमदाराला मोफत घर देणार नाही, त्या जागेची योग्य किंमत घेतली जाईल.'

Jayant Patil: 'राष्ट्रवादी नवऱ्याच्या अन् शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत', सुजय विखेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणतात...
मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी टीका केली होती. ''महाविकास आघाडीचा संसार म्हणजे, लग्न राष्ट्रवादी-शिवसेनेचे, राष्ट्रवादी नवऱ्याच्या आणि शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत'', असे सुजय विखे म्हणाले होते. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी खोचक शब्दात टोला लगावला आहे.
'षंढ लोकांचे काय करायचे...'
आज जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुजय विखेंच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ''आम्हाला नवरा बायको, पाहुणे अशा उपमा दिल्या जात आहेत. पण, षंढांचे काय करायचे, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे त्यांच्यावर जास्त काही बोलून फायदा नाही'',असा खरमरीत टोला पाटलांनी यावेळी लगावला.
'राष्ट्रवादी नवऱ्याच्या अन् शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत', सुजय विखेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणतात...#jayantpatil#SujayVikhePatil -https://t.co/nFmfFKiceJpic.twitter.com/InubE0p5UD
— Lokmat (@lokmat) March 28, 2022
'आमदारांना मोफत घरे देणार नाही'
आमदारांना सरकारने जाहीर केलेल्या मोफत घरांमुळे शरद पवार नाराज आहेत. त्यावर जयंत पाटलांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ''गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर भाष्य केले आहे. आमदारांना मोफत घरे देणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत. बांधकाम झाल्यानंतर त्या भागात जी किंमत असेल, त्या किमतीतच आमदारांना घरे मिळणार आहेत. कुठल्याही आमदारांना मोफत घरे देणार नाही'', असे त्यांनी स्पष्ट केले.