मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून जळगाव व पुण्यात बलात्काराच्या घटना घडल्या. अंबाजोगाईत घरात एकटी असल्याचे पाहून अत्याचार करण्यात आला. जळगाव - तालुक्यातील कुसुंबा येथील एका १६ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर नागपूर येथे बलात्कार केल्याप्रकरणी प्रवीण शेषराव गोतमारे (वर्धा) याच्याविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुसुंबा येथील एका १६ वर्षीय युवतीला याच भागात भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या प्रवीण गोतमारे याने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने या अल्पवयीन मुलीला ५ मे रोजी कुसुंबा येथून पळवून नेले. दोघे जण नागपूर येथील बुटीबोरी भागातील कमलाबाई चौधरीकडे आले. आरोपी प्रवीण याने चौधरी यांच्या मालकीची खोली भाड्याने घेत याठिकाणी राहायला सुरुवात केली. प्रवीणने पीडित युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी पोलीसांची अधिक तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
लग्नाचे आमिष दाखवून जळगाव व पुण्यात बलात्कार
By admin | Updated: June 18, 2014 05:02 IST
लग्नाचे आमिष दाखवून जळगाव व पुण्यात बलात्काराच्या घटना घडल्या. अंबाजोगाईत घरात एकटी असल्याचे पाहून अत्याचार करण्यात आला
लग्नाचे आमिष दाखवून जळगाव व पुण्यात बलात्कार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}