शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

जैन सहेली मंडळाच्या वतीने बुटीबोरीत आरोग्य तपासणी शिबिर

By admin | Updated: October 7, 2014 01:07 IST

समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ८ आॅक्टोबर रोजी भव्य

ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ ८ आॅक्टोबर रोजी आयोजन : महिला व बालकांसाठी नि:शुल्कनागपूर : समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ८ आॅक्टोबर रोजी भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वुमन डेव्हलपमेन्ट अ‍ॅन्ड वेल्फेअर सेंटर, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अ‍ॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीअल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. डॉ.संजय दर्डा व डॉ.अनिता दर्डा यांच्या नेतृत्वात उपराजधानीतील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ या शिबिरात सहभागी होणार आहेत. महिला व बालकांसाठी हे शिबिर नि:शुल्क आहे. या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महात्मे नेत्रपेढी इस्पितळ यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.जैन सहेली मंडळातर्फे समाजातील महिलांच्या प्रगतीसाठी वर्षभर सातत्याने निरनिराळ्या विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी जैन सहेली मंडळातर्फे निरनिराळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात. महिला व बालकांच्या सक्षमीकरणाचाच एक भाग म्हणून या भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या आरोग्य शिबिरात नागपुरातील महात्मे नेत्रपेढी इस्पितळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळ येथील तज्ज्ञ डोळ्यांची तपासणी करतील. गरजवंत रुग्णांना मोफत चष्मेवाटप करण्यात येईल. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार महात्मे नेत्रपेढी इस्पितळ येथे मोतिबिंदूची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल. याकरिता येणाऱ्या रुग्णांना स्वत:चे ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. नोंदणी शिबिराच्या ठिकाणीच दुपारी १ वाजेपर्यंत होईल. बुटीबोरी येथील महिलांनी या सुवर्णसंधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन जैन सहेली मंडळाच्या अध्यक्ष माधुरी बोरा यांनी केले असून अधिक माहितीसाठी रजनी शहलोत (९३७३१००६९०), रीतिका संघवी (९४२०३९७५६८) व अमिषा नगरवाला (९८२२२६५५६५) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)शिबिरात होतील या तपासण्याया शिबिरात महिला व बालकांची वैद्यकीय तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्याकडून आरोग्य तपासणी करण्यात येईल. शिबिरात हिमोग्लोबिन, इसीजी व रक्तदाबाची नि:शुल्क तपासणी होणार आहे. सोबतच यावेळी नि:शुल्क नेत्रतपासणी, मोतिबिंदूचा मोफत उपचार व चष्मा वितरण करण्यात येणार आहे.