शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्ती घडविण्यात जहाँगीर यांचा हातखंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 00:24 IST

उदयोन्मुख कलाउपासक : विविध मूर्तींसह कलाकुसरीच्या वस्तू राज्यभर

शेखर धोंगडे -- कोल्हापूर --उपजत कलाकाराला कोणतीच बंधने कशातही अडकवू शकत नाहीत. जात, पात, धर्म यांचा तर विचारच नको, याचेच एक चालते-बोलते उदाहरण म्हणजे जहाँगीर मकानदार. कोल्हापूर येथील घोडके कॉलनीमध्ये जहाँगीर हे गणेशमूर्ती तयार करतात. ‘जी आर्टस्’ नावाने त्यांचा नावलौकिक संपूर्ण जिल्हाभर आहे. गणेशमूर्ती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारण्याबरोबरच विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू अगदी सुरेखपणाने बनविण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कलेची उपासना करणाऱ्या जहाँगीर यांनाही सुरुवातीला आपल्याच माणसांकडून विरोध झाला. मात्र, टीकेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा व झाल्या गोष्टीची कटुता मनात न ठेवता, त्यांनी कलेलाच सर्वस्वी मानले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इतर कलाकारांच्या हाताखाली शिकत, त्यांचे मार्गदर्शन घेत आणि त्याला मेहनतीची जोड देत जहाँगीर यांनी आपली कला बहरण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात वर्षांपासून ते गणेशमूर्तीसह विविध मूर्तीं बनवितात. त्यातील सुबकता, आकर्षकता, रंगसंगती यामुळे त्यांच्या मूर्र्तींना मागणी वाढत आहे. सध्या ते गणेशोत्सवानिमित्त मागणीनुसार पाच इंचापासून ते १३ फुटांपर्यंत तसेच छायाचित्रानुसार कलाकुसरीच्या मूर्ती व प्रतिमा साकारण्यामध्ये मग्न आहेत. कलाप्रेमी जहाँगीर जेव्हा गणेशभक्तांच्या हाती मूर्ती प्रदान करतात तेव्हा ते गणपतीचे श्लोकही म्हणतात. या कलेच्या माध्यमातून जहाँगीर यांचा नावलौकिक कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा, रत्नागिरी, सांगली, पुण्यापर्यंत पोहोचला आहे.कोल्हापूर येथील घोडगे कॉलनीमध्ये गणेशमूर्तीला रंग देताना जहाँगीर मकानदार.