शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील नवसाला पावणारी जागृत मोहटादेवी

By admin | Updated: September 27, 2014 23:00 IST

शहरातील जागृत व नवसाला पावणारी म्हणून मोहटादेवी प्रसिद्ध आहे. कामधंद्यानिमित्त आलेल्या वंजारी समाजाने गावदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी 45 वर्षापूर्वी मंदिराची उभारणी केली.

सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
शहरातील जागृत व नवसाला पावणारी म्हणून मोहटादेवी प्रसिद्ध आहे. कामधंद्यानिमित्त आलेल्या वंजारी समाजाने गावदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी 45 वर्षापूर्वी मंदिराची उभारणी केली.
उल्हासनगरने नुकतीच 66 वर्षे पूर्ण केली असून यापूर्वी येथे ब्रिटिशकालीन लष्करी छावणी होती. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर निर्वासित सिंधी समाजाला या लष्करी छावणीतील बॅरेक, ब्लॉक व खुल्या जागेत वसविण्यात आले होते. सिंधी समाजाच्या व्यापारी वृत्तीमुळे शहरातील उद्योग भरभराटीला येऊन त्यानिमित्ताने कामगारवर्ग  शहरात येथे वसू लागला.
मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील वंजारी समाज कामधंद्यानिमित्त शहरात येऊन कौशलनगरात स्थायिक झाला. मात्र, जिल्ह्यातील गावदेवी, मोहटादेवी म्हणजे रेणुकामाता येथे नसल्याने त्यांना चैन पडेना. त्यामुळेच त्यांनी देवीची स्थापना करण्याचे ठरविले.  नगर जिल्ह्यातील नागरिक व वंजारी समाजातील कार्यकर्ते एकत्र येऊन 1972 मध्ये मोहटादेवीच्या मंदिराची उभारणी केली. तसेच जगदंबा चॅरिटेबल ही संस्था स्थापन करून संस्थेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविणो सुरू केले.
मोहटादेवी मंदिर संस्थेच्या पहिल्या अध्यक्षाचा मान भगवान खेडेकर यांना मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची देखरेख व उभारणी झाली आहे.  सुरुवातीला पत्र्याच्या शेडमधील मंदिरात देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवी शहरात प्रसिद्ध असून नवरात्रीत दर्शनासाठी भक्तांच्या लांबचलांब रांगा  येथे लागतात. तसेच नवस फेडण्यासाठी महिलांची एकच गर्दी मंदिराबाहेर होत असल्याने संस्थेचे स्वयंसेवक रात्रंदिवस सेवा देतात. नवरात्रीदरम्यान विविध कार्यक्रमांसह मिरवणूक, भंडारा व यात्र भरत असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिका:यांनी दिली.  नवरात्रीला मंदिर परिसर दिव्यांनी लख्ख उजळून निघत असून देवीच्या स्थापनेला 45 वर्षे झाली आहेत. लग्न, मुंज, गृहप्रवेश आदी कार्यक्रम देवीच्या कलाशिवाय नागरिक करीत नसल्याची माहिती भाविकांनी दिली. मंदिरात 24 तास पुजारी असून येथूनच अहमदनगर व शिर्डीला जाण्यासाठी विशेष बसची सोय राज्य परिवहन मंडळाने भक्तांसाठी केली आहे.