शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

चित्रपटक्षेत्राशी संबंधित नसतानाही आॅस्कर पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अविस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 18:09 IST

चित्रपटक्षेत्राशी थेट संबंध नसतानाही चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत तंत्रज्ञानातील योगदानाकरिता आॅस्कर पुरस्कार मिळाला, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षण आहे. या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या वेगळ्या कामावर लक्ष्य केंद्रित केले असून, सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, फायर ब्रिगेड, अँम्बुलन्स यांच्याकरिता ‘रेडिओ रिपिटर’ प्रोजेक्ट हाती घेतले आहे.

पुणे  - चित्रपटक्षेत्राशी थेट संबंध नसतानाही चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत तंत्रज्ञानातील योगदानाकरिता आॅस्कर पुरस्कार मिळाला, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षण आहे. या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या वेगळ्या कामावर लक्ष्य केंद्रित केले असून, सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, फायर ब्रिगेड, अँम्बुलन्स यांच्याकरिता ‘रेडिओ रिपिटर’ प्रोजेक्ट हाती घेतले आहे. मोबाईलवर रेडिओ कार्यान्वित करण्यासाठीचे सॉफ्टवेअर विकसित  करीत आहे. भविष्यात संधी मिळाल्यास पुन्हा चित्रपटनिर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला आवडेल अशी भावना हवाई छायाचित्रण क्षेत्रातील संशोधनासाठी आॅस्करच्या तंत्रज्ञान पुरस्कारावर आपली मोहोर उमटविलेल्या विकास साठ्ये यांनीव्यक्त केली.अरभाट फिल्मस आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने साठ्ये यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध दिग्दर्शकउमेश कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुंबईत शालेय शिक्षण आणि पुण्याच्या विश्वकर्मा टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे अभियांत्रिकीचे शिक्षणघेतलेल्या साठ्ये यांनी कमिन्स येथे प्राध्यापकाची नोकरी करतानाच एम.टेक पूर्ण केले. आपल्या उच्चशिक्षणाचा उपयोग संशोधन क्षेत्रासाठी व्हावाम्हणून त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या क्वीनहाऊसमधील एरिअल फिल्मिंग  प्रॉडकशनसाठी काम करण्याची संधी त्यांना मिळाली.जॉन कॉयल, ब्रँड बुकहँम आणि विकास साठे या टीमने ‘एरिअल माऊंट’ ही प्रणाली विकसित केली. या प्रणालीविषयी सांगताना विकास साठ्ये म्हणाले,शॉटओव्हर कँमेरा सिस्टम एक असा कँमेरा माऊंट आहे जो हवाई चित्रीकरणात वापरला जातो. कँमेरा माऊंट हेलिकॉप्टरच्या पायथ्याशी जोडला जातो. जो कँमेरा आणि लेन्स सांभाळतो. माऊंटचे प्राथमिक कार्य कँमेरा पर्यंत पोहोचणारे कंपन दूर करणे आणि स्थिर फुटेज प्राप्त करणे आहे. हेलिकॉप्टरच्या खाली लावलेल्या माऊंटद्वारे चित्रीकरण जास्तीत जास्त स्थिर कसे ठेवता येईल हे आमच्यासमोरचे मोठे आव्हान होते. त्यात आम्ही यशस्वी झालो. आम्ही तयार केलेला हा एरिअल माऊंट हा आॅस्कर नामांकनासाठी पाठविला. त्यांचा प्रतिसाद आला. स्काईपवर आमची मुलाखत झाली आणि त्यानंतर तुम्हाला पुरस्कार देत असल्याचा मेल आहे.10 फेब्रुवारीचा क्षण उजाडला. सारे काही स्वप्नवत वाटत होते. पुन्हा पाच वर्षांनी आम्ही चौघे भेटलो. हा दिवस कधीच विसरू शकत नाही. चित्रपटासाठी हवाई चित्रीकरण करणे ही खूप खर्चिक बाब आहे. त्यासाठी गुंतवणूक असायला हवी. ज्या औद्योगिक कंपन्यांकडे पैसे आहेत त्यांनी इच्छाशक्ती दाखविली तर आम्हाला नक्कीच संधी मिळू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले. परदेशातील कामाच्या पद्धतीबददल बोलताना ते पुढे म्हणाले, प्रत्येक वेळीतुम्हाला तुमचा परफॉर्मन्स सिद्ध करावा लागतो. कामाचे रिझल्ट दाखवावे लागतात. ते दाखविले नाही तर तुम्हाला  ‘गुडबाय’ केले जाऊ शकते. स्पर्धेतटिकून राहाण्यासाठी स्वत:चे ज्ञान अद्ययावत करणे हाच एकमेव पर्याय आहे. शिक्षण देशात घ्या किंवा परदेशात घ्या, पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रँक्टीकलगोष्टींवर भर दिला पाहिजे. वेगवेगळे प्रयोग करीत राहिले पाहिजे. स्वत:च्या कामावर स्वत:चा विश्वास असला पाहिजे. 

टॅग्स :PuneपुणेOscarऑस्कर