शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

राज्यातील आयटीआयच्या सात हजार जागा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 8:58 PM

राज्यातील आयटीआयमधील प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकुण प्रवेश क्षमता जवळापास दीड लाखांवर पोहचली आहे.

ठळक मुद्देव्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरीय समुपदेश फेरी नवीन जागा व चौथ्या फेरीत उर्वरीत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी प्रवेशाला मुदतवाढ

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश क्षमतेत सात हजार जागांची भर पडली आहे. त्यामुळे एकुण प्रवेश क्षमता जवळापास दीड लाखांवर पोहचली आहे. प्रामुख्याने खासगी संस्थांमधील जागांमध्ये ही वाढ झाली आहे. दरम्यान, या जागांवरील प्रवेशासह महापुरामुळे प्रवेश न घेऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) प्रवेशासाठीची मुदत वाढविली आहे. तसेच नव्याने जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीचा समावेश प्रक्रियेत करण्यात आला आहे. राज्यातील आयटीआयमधील प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत सुमारे १ लाख ४२ हजार जागा भरल्या जाणार आहे. तिसºया फेरीअखेरपर्यंत जवळपास ७० हजार जागांवर प्रवेश झाले आहेत. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने राज्यातील ४४ नवीन खासगी आयटीआयला मान्यता दिली आहे. तसेच ४५ नवीन तुकड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे प्रवेश क्षमता सुमारे ७ हजार २०० ने वाढली आहे. चौथी फेरी दि. १३ गस्ट रोजी संपणार होती. मात्र, राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आलेला नाही. त्यामुळे नवीन जागा व चौथ्या फेरीत उर्वरीत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती '' डीव्हीईटी'' चे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली.सुधारित वेळापत्रकानुसार चौथी फेरी व समुपदेश फेरीतील प्रवेशासाठी दि. १६ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही प्रक्रिया दि. १३ ऑगस्ट रोजी संपणार होती. तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरीय समुपदेश फेरी घेतली जाणार आहे. या फेरीमध्ये संबंधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल. या फेरीनंतर शासकीय व खासगी संस्थांमधील संस्थास्तरीय जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होणार आहे. --------------आयटीआय प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक -चौथी प्रवेश फेरी -दि. १६ ऑगस्टपर्यंत - चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत मुळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेश घेणेदि. १६ ऑगस्टपर्यंत - समुपदेशन फेरीसाठी मुदतीत अर्ज न करू शकलेल्या उमेदवारांनी नव्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणेदि. १७ ऑगस्ट - समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी प्रसिध्द करणेजिल्हास्तरीय समुपदेशन फेरी - राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षम संस्थांमधील चौथ्या फेरीच्या समाप्तीनंतर रिक्त राहिलेल्या जागा या फेरीत उपलब्ध असतील. दि. १७ ऑगस्ट - रिक्त जागांची माहिती प्रसिध्द करणेदि. १९ ऑगस्ट - इच्छुकांनी जिल्हा प्रशिक्षण संस्थेत हजर राहून या फेरीसाठी हजेरी नोंदविणे. त्यातून गुणवत्ता यादी प्रसिध्द करणेदि. २० ते २३ ऑगस्ट - गुणवत्ता क्रमांकानुसार प्रवेशाच्या जागांचे वाटप व प्रत्यक्ष प्रवेश. शासकीय संस्थांची संस्थास्तरीय समुपदेश फेरी -दि. २४ ऑगस्ट - जिल्हास्तरीय फेरीनंतर रिक्त जागांची माहिती प्रसिध्द करणेदि. २६ ऑगस्ट - संस्थेत प्रत्यक्ष हजेरी नोंदविणे, गुणवत्ता यादी प्रसिध्द करणेदि. २७ व २८ ऑगस्ट - गुणवत्ता यादीनुसार प्रवेशाच्या जागांचे वाटप व प्रत्यक्ष प्रवेशखासगी संस्थास्तरावरील प्रवेश -दि. १३ सप्टेंबरपर्यंत - संस्थास्तरावरील २० टक्के जागा व जिल्हा फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रिया

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणiti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थी