कागल : प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व पदाधिकारी आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार सुनेत्राताईंचे नाव उपमुख्यमंत्री म्हणून निश्चित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्याचबरोबर पवार घराणे पुरोगामी विचारांचे असल्याने ते निधनानंतरचे सर्व विधी तिसऱ्या दिवशीच पुर्ण करतात. या दुर्देवी प्रसंगी नियतीने टाकलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यामुळे पटेल, तटकरे व अन्य कोणाला या घडामोडीत व्हिलन ठरविणे चुकीचे आहे असे मत व्यक्त करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठराखण केली. लिंगणुर दुमाला ता. कागल येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान केल्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. ते म्हणाले की, अजितदादांच्या अपघाती निधनानंतर संपुर्ण राज्याला धक्का बसला. अशा स्थितीत आमच्या पक्षाबद्दल इतरांना लुडबुड करण्याची गरज नाही. अशा दुख:द प्रसंगी ते आम्हाला का डिवचत आहेत. ..त्यामुळे विलीनीकरणाबाबत आम्हाला माहिती नाहीआता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष सावरत आहे. विलीनीकरण असेल अथवा अन्य निर्णय घेण्यास त्या समर्थ आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरणाबाबत झालेल्या चर्चेत अजितदादा एकटेच सहभागी होते. त्यामुळे आम्हाला जादा माहिती नाही. पक्ष जो निर्णय घेईल तेच माझे मत आहे. असे उत्तरही त्यांनी दिले. शरद पवारांना महाविकास आघाडी पुन्हा राज्यसभेवर पाठविणार आहे. या बद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Web Summary : Hasan Mushrif defends Praful Patel and Sunil Tatkare, stating they facilitated Sunetra Pawar's deputy CM role after Ajit Dada's death, fulfilling family wishes. Blaming them is unfair, especially during a sensitive time. He added that the party will decide on the merger.
Web Summary : हसन मुश्रीफ ने प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे का बचाव किया, कहा कि उन्होंने अजित दादा की मृत्यु के बाद सुनेत्रा पवार की उप मुख्यमंत्री भूमिका को सुविधाजनक बनाया, परिवार की इच्छाओं को पूरा किया। उन्हें दोषी ठहराना अनुचित है, खासकर संवेदनशील समय में। उन्होंने कहा कि विलय पर पार्टी फैसला करेगी।