शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

जेरुसलेमचा मुद्दा पेटण्याची चिन्हे; अमेरिका, इस्त्रायली वस्तूंवर मुस्लीम समाजाचा बहिष्कार; आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 3:42 AM

इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमची घोषणा करणाºया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात मुंबईतील मुस्लीम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित निर्णय अमेरिकेने तत्काळ रद्द करावा, म्हणून अमेरिका, इस्रायली वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन रजा अकादमीने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. या आवाहनाला अधिकाधिक मुस्लीम आणि इतर धर्मीय संघटनांनी पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी, २१ डिसेंबरला मुंबईतील इस्लामिक जिमखान्यामध्ये रजा अकादमीने महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.

मुंबई : इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमची घोषणा करणा-या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात मुंबईतील मुस्लीम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित निर्णय अमेरिकेने तत्काळ रद्द करावा, म्हणून अमेरिका, इस्रायली वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन रजा अकादमीने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. या आवाहनाला अधिकाधिक मुस्लीम आणि इतर धर्मीय संघटनांनी पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी, २१ डिसेंबरला मुंबईतील इस्लामिक जिमखान्यामध्ये रजा अकादमीने महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.रजा अकादमीचे सरचिटणीस मोहम्मद सईद नूरी यांनी सांगितले की, राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात हे आंदोलन होईल. शांततापूर्ण मार्गाने आपल्या भावना दुखावल्याचे लक्षात आणून देण्यासाठी बहिष्काराचे अस्त्र मुस्लीम समाजाने स्वीकारले आहे. अमेरिकेतून देशात आयात होणाºया सर्वच प्रकारच्या वस्तूंवर मुस्लीम समाज बहिष्कार घालून रोष व्यक्त करणार आहे. याआधीही चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे समाजाने बहिष्कारातून अमेरिकेला वठणीवर आणले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले....म्हणून आंदोलन-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमची घोषणा केली आहे. मात्र पॅलेस्टाईनचे पंतप्रधान डॉ. रामी हमदल्ला यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतलेली आहे. शिवाय युनोमध्येही १४ विरोधात १ असा ठराव करत ट्रम्प यांचा निर्णय रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पMumbaiमुंबईMuslimमुस्लीम