इस्लामिक राष्ट्रे आपापसात युद्ध करतील, देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल; बाळूमामा भंडारा यात्रेत कृष्णात डोणे महाराजांनी केली भाकणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:19 IST2026-03-16T14:18:04+5:302026-03-16T14:19:42+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात छोटे पक्ष मोठे होणार, केंद्रात..

Islamic nations will fight among themselves, there will be great chaos in the country's politics; Krishnat Done Maharaj predicted during Balumama Bhandara Yatra | इस्लामिक राष्ट्रे आपापसात युद्ध करतील, देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल; बाळूमामा भंडारा यात्रेत कृष्णात डोणे महाराजांनी केली भाकणूक

इस्लामिक राष्ट्रे आपापसात युद्ध करतील, देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल; बाळूमामा भंडारा यात्रेत कृष्णात डोणे महाराजांनी केली भाकणूक

बाजीराव जठार    

वाघापूर : इस्लामिक राष्ट्रे आपापसात युद्ध करतील, राजकारणात मोठा गोंधळ होईल, साखर कारखान्याचा मॅनेंजर आनंदात राहील, कोरोनापेक्षा मोठा आजार येईल, शंभर वर्षांनंतर माणूस पृथ्वी सोडेल, कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठे भगदाड पडेल, देशात समान नागरी कायदा होणार अशी भाकणूक कृष्णात बाबूराव डोणे-पुजारी (वाघापूरकर) यांनी श्रीक्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथील बाळूमामा भंडारा यात्राप्रसंगी केली.

बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभो भाविकांसमोर काल, रविवारी पहाटे चार वाजता सुरू झालेली ही भाकणूक साडे सहा वाजता संपली. तब्बल अडीच तास सुरु असलेली ही भाकणूक ऐकायला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

अशी केली भाकणूक..

राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, आदमापूर हे गाव प्रतिपंढरपूर होईल, होईल होईल जलप्रलय होईल, जलाशयाला मोठं भगदाड पडंल,  जातीवाद, राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येईल, रेल्वे, विमाने मोठ्या वाहनांचे अपघात होतील, कर्नाटक राज्याचे राजकारण डळमळीत होणार, महाराष्ट्राच्या राजकारणात छोटे पक्ष मोठे होणार, केंद्रात मात्र कमळ फुलणार, बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल, जगात सत्त्य फासावर जाणार, १२ वर्षांची मुलगी भ्रतार मागेल, तरुण पिढी वाईट मार्गाला लागंल, ३५ वर्षांचं म्हातारपण येईल.

वाचा: निढोरीतून आदमापूरकडे दुधाच्या घागरींची जल्लोषी मिरवणूक, भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरण

महागाईचा भस्मासूर येईल, जगणं मुश्कील होईल

येणार येणार राज्य गुंडांचं येणार, समान नागरी कायदा देशात होणार, उन्हाळ्याचा पावसाळा होईल, पावसाळ्याचा उन्हाळा होईल, वागा वागा सत्त्या न वागा, जंगलातला पक्षी, प्राणी गावात येईल, आदमापूर प्रति पंढरपूर होईल, माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जयजयकार होईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल.

उन्हाळ्याचा पावसाळा अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल

पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळेल, उन्हाळ्याचा पावसाळा होईल अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल. नीतिमत्तेनं राहशीला तर सुखात राहशीला, ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल. वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील. भाकणुकीला हजारो भाविक उपस्थित होते. 

Web Title : बालूमामा भंडारा भविष्यवाणी: कृष्णात डोने द्वारा इस्लामी युद्ध, राजनीतिक अराजकता की भविष्यवाणी

Web Summary : कृष्णात डोने ने इस्लामी राष्ट्रों के युद्ध, राजनीतिक उथल-पुथल और एक बदतर महामारी की भविष्यवाणी की। उन्होंने प्राकृतिक आपदाओं, समान नागरिक संहिता और सामाजिक बदलावों का अनुमान लगाया, जिसमें बढ़ती महंगाई और आम आदमी के लिए चुनौतियां शामिल हैं। उन्होंने कहा कि आदमापुर पंढरपुर जैसा बनेगा।

Web Title : Balumama Bhandara Prophecy: Islamic Wars, Political Chaos Predicted by Krushnat Done

Web Summary : Krushnat Done predicted Islamic nations at war, political turmoil, and a worse pandemic. He foresaw natural disasters, a uniform civil code, and societal shifts, highlighting rising inflation and challenges for the common person. Admapur will become like Pandharpur, he added.