शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय तस्कर सोरामला पंजाबमधून अटक

By admin | Updated: August 29, 2014 00:57 IST

देशभरातून शिकार झालेल्या वाघांच्या अवयवांची नेपाळला नेऊन विक्री करणारा आंतरराष्ट्रीय तस्कर सोराम (शिवराम) बावरिया याला गुरूवारी पहाटे ३.३० वाजता पंजाबमधील होशियारपूर येथून अटक करण्यात आली.

मेळघाट सेलची रेकी : दिल्लीतून नेपाळला नेत होता वाघांचे अवयवनरेंद्र जावरे - अमरावतीदेशभरातून शिकार झालेल्या वाघांच्या अवयवांची नेपाळला नेऊन विक्री करणारा आंतरराष्ट्रीय तस्कर सोराम (शिवराम) बावरिया याला गुरूवारी पहाटे ३.३० वाजता पंजाबमधील होशियारपूर येथून अटक करण्यात आली. तो एक वर्षापासून फरार होता. मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या माहितीवरून वाईल्ड लाईफ क्राईम कंल्ट्रोल बोर्ड दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.सोराम ऊर्फ शिवराम बावरिया (४८, रा. सोनीपत, हरियाणा) हा देशभरातील वाघांची शिकार करून कातडे व अवयवांची नेपाळला जाऊन विक्री करायचा. गुरुवारी पंजाबच्या होशियारपूर येथून पहाटे ३.३० वाजता त्याला मित्राच्या घरातून अटक करण्यात आली. त्याने देशभरातील किती वाघांचे कातडे व अवयवांची नेपाळला तस्करी केली याचा लवकरच खुलासा होणार आहे. सरजूचा भाऊ सोरामनागपूर, अकोट, ढाकणा (मेळघाट) व्याघ्र प्रकल्पात वाघांची शिकार प्रकरणात गुंतलेला सरजू बावरिया याला गतवर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्ली येथे अटक करण्यात आली. मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सायबर सेलचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक विशाल माळी, परीक्षित डंबारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली होती. सरजू व त्याचा सहकारी नरेश एच. आर. ११-१००१ या क्रमांकाच्या कारमधून वाघाची हाडे व रोख अडीच लक्ष रूपये आणताना जाळ्यात अडकला होता. त्याच सरजू बावरिया या तस्कराचा सोराम ऊर्फ शिवराम बावरिया हा सख्खा भाऊ असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघांचाही वाघ तस्करीचा व्यवसायसरजू बावरिया हा देशभरातील जंगलात वाघांची शिकार करण्यासाठी सहकाऱ्यांना प्रशिक्षण व आर्थिक मदत पोहचवित होता.शिकार झाल्यावर कातडे व अवयव दिल्ली येथील फायनान्सर सूरज पाल ऊर्फ चाचा याला पुरविले जात होते. तर सोराम बावरिया हा दिल्ली येथून नेपाळ स्थित तस्करांना त्याचा पुरवठा करीत होता. गोरखपूरमार्गे नेपाळला तो स्वत: जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.