शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय प्रेमविवाह: बहिणीचे कुटुंब ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: October 3, 2015 02:36 IST

पातूर तालुक्यातील घटना; तीन जखमी झालेल्या सवरेपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल.

पातूर (जि. अकोला) : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेऊन भावाने तिला पती आणि मुलीसह ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कार्ला- अंबाशी मार्गावर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या अपघातात जखमी झालेल्या तिघांना अकोला येथील सवरेपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका युवतीने पाच वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहास मुलीच्या घरच्या मंडळींने आधीपासून विरोध केला होता. गावातील मंडळींचा दबाव आणि धमक्यांना घाबरून युवती पतीसह बाहेरगावी निघून गेली होती. साधारणत: वर्षभरापूर्वी हे जोडपे पुन्हा कार्ला येथे नांदावयास आले होते. शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी ती पती सुरेंद्रसोबत दूचाकीने पातुरकडे येत होती. त्यावेळी तिचा भाऊ मागून ट्रॅक्टर घेऊन आला आणि त्याने दूचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पती, पत्नी आणि त्यांची चार वर्षाची चिमुकली जखमी झाले. घटनेनंतर जखमींनी पोलीस ठाण्यात पोहोचून आपबिती सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी युवतीच्या भावास लगेचच ताब्यात घेतले. त्यानंतर याबाबत गोंधळ निर्माण करणारी माहिती समोर आली. ब्रेक नादुरूस्त झाल्यामुळे मोटारसायकलला ट्रॅक्टरची धडक लागली असल्याचे युवतीच्या भावाने पोलिसांना सांगितले. युवतीनेही भावाचा बचाव करत, आपणास गावातील लोकांनी लाठय़ा-काठय़ांनी मारल्याचे सांगितले. यासंदर्भात पातुरचे ठाणेदार अनील जुमळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ज्योत्स्नाने मारहाण केल्याची तक्रार दिली आहे; परंतु तिच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा प्रथमदर्शनी तरी दिसल्या नाही. जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर कारवाई केली जाईल.