शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो-३’च्या मार्गावरील इमारतींचा विमा

By admin | Updated: March 14, 2015 05:03 IST

ज्या मार्गावरून मेट्रो-३ जाईल त्या ठिकाणच्या इमारतींना कोणताही धोका होणार नाही. परंतु त्या मार्गावरील इमारतींना किती हादरे बसतात याचे

मुंबई : ज्या मार्गावरून मेट्रो-३ जाईल त्या ठिकाणच्या इमारतींना कोणताही धोका होणार नाही. परंतु त्या मार्गावरील इमारतींना किती हादरे बसतात याचे मूल्यमापन करण्यासाठीची कायमस्वरूपी यंत्रणा उभी केली जाईल. शिवाय, त्याचे नियमित मॉनिटरिंग केले जाईल आणि गरज पडल्यास विमा काढून दिला जाईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली. या विषयावर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी दिली होती. त्यावर डॉ. पाटील म्हणाले, मेट्रो-३साठी ११.८० हेक्टर जागा कायमस्वरूपी लागणार आहे. त्यात जाणाऱ्या १६१३ झोपड्यांचे एमयूटीपीच्या धोरणानुसार पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी आजपर्यंत सहा प्रकारचे सर्व्हे झाले आहेत. विविध पक्षांची कार्यालयेदेखील हटवावी लागतील. सरकारने एमटीएनएल, वर्ल्ड ट्रेड सेंटर, फायर प्रेस हाउस या ठिकाणच्या जागा काही वर्षांसाठी घेण्याचे ठरवले असून, त्याकरिता ११७ कोटींची तरतूद केल्याची माहितीही राज्यमंत्र्यांनी या वेळी दिली. जमिनीपासून २० ते २५ मीटर खालून मेट्रो ३ जाणार आहे. ३२ किलोमीटर मार्गावरून ती जाणार आहे. त्यात आपल्याकडे भूभागात बसाल्ट खडक आहे. अन्य राज्यांत मऊ जमीन असणाऱ्या ठिकाणीदेखील मेट्रो यशस्वी झाली आहे. भूभागातून मेट्रो जाण्यामुळे काही इमारतींचा पुनर्विकास करताना अडचणी निर्माण होतील असे म्हणणे चुकीचे आहे. उलट मेट्रोच्या बेल्टमध्ये येणाऱ्या इमारतींनी त्यांचे पुनर्वसनाचे काम याच कामात करून घ्यावे, असेही डॉ. पाटील या वेळी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)