शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी कामगारांना विम्याचे कवच

By admin | Updated: October 25, 2015 01:45 IST

ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीमध्ये लवकरच वाढ केली जाईल, तसेच त्यांना विम्याचे कवच प्रदान केले जाईल, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे सांगितले.

मुंबई : ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीमध्ये लवकरच वाढ केली जाईल, तसेच त्यांना विम्याचे कवच प्रदान केले जाईल, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे सांगितले. ऊसतोडणी कामगारांचे हित लक्षात घेऊन, कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याचा निर्णय लवादाकडून घेण्यात आला आहे. २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीतील पाच हंगामांसाठी याबाबतचा करार ग्राह्य राहील. ऊसतोडणीचे मजूर गंभीर जखमी, तसेच अपघाती मृत्यू झाल्यास त्यासंबंधी सामूहिक अथवा अन्य विमा योजना लागू करण्यासही लवादाने मंजुरी दिली आहे. विमा कंपन्यांशी चर्चा करून सहकार विभाग याबाबतचा प्रस्ताव तयार करेल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.ऊसतोडणी मजुरांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी पंकजा मुंडे व माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचा लवाद शासनाने नेमला आहे. लवादाचा निर्णय मुंडे यांनी पत्रपरिषदेत जाहीर केला. यावेळी जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे आदी उपस्थित होते. लवादाच्या निर्णयानुसार राज्यातील विविध ऊसतोडणी संघटनांनी आपल्या प्रत्येक मुकादम व प्रत्येक ऊसतोडणी कामगारांची नाव, पत्ते व ओळखपत्रे (आधारकार्ड इत्यादी) संबंधित कारखान्याकडे जमा केल्यानंतर संघटनेची वर्गणी व मुकादम कमिशन दिले जाणार आहे.काही मुकादम व कंत्राटदारांनी कारखान्याकडून ऊसतोडणीसाठी अग्रीम रक्कम उचल घेतली आहे व कामाची पूर्तता केली नाही. त्यामुळे राज्यातील कारखान्यांची अनेक वर्षा$ंपासूनच्या मोठ्या प्रमाणात रक्कम थकीत आहे. या थकीत रकमेच्या वसुली केली जाईल. ही रक्कम वसूल करू न देणे हे संबंधित ऊसतोडणी कामगार व मुकादम संघटना यांना बंधनकारक राहील. (विशेष प्रतिनिधी)2011 मध्ये पुणे येथे साखर हंगाम २०११-१२ ते २०१३-१४ या तीन हंगामाकरिता करार करण्यात आला होता. त्या करारामध्ये निश्चित झालेल्या रकमेवर हंगाम २०१५-१६ पासून पुढील पाच वर्षांकरिता वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार, डोकी सेंटर, गाडी सेंटर व टायर सेंटर दरामध्ये २० टक्के वाढ करण्यात येत असून, मुकादम, कंत्राटदार कमिशन दर १८.५ टक्के करण्यात येत आहे.लवादाच्या निर्णयानुसार ऊसतोडणी मजुरांना कारखान्यांच्या गाळप हंगाम संपेपर्यंत कार्यरत राहावे लागेल. ऊसतोडणी व मुकादम कमिशन या मंजूर रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांकडून घेतल्याची कारखान्यांकडे तक्र ार आल्यास त्याची शाहनिशा करून ती सत्य असल्याचे आढल्यास, त्या रकमेची कपात केली जाईल. लवादाचा निर्णय अमान्यकोल्हापूर : ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात २० टक्के वाढ करीत पाच वर्षांचा करार करण्यास लवादाने मंजुरी दिली आहे. त्याचा ऊसतोडणी व वाहतूक संघटनांनी निषेध केला असून जुजबी दरवाढ करीत, मागील वर्षाचा फरक बुडवून तीनऐवजी पाच वर्षांचा करार करून लवादाने मजुरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याची भावना संघटनेतून उमटत आहे.शनिवारी दुपारी मुदाळ तिट्टा येथे ‘रास्ता रोको’ करून संघटनेने लवादाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. लवादाच्या या निर्णयाविरोधात आता आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार आहे. दोन दिवसांत बीड येथे राज्यातील ऊसतोडणी कामगार संघटनांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. लवादाने राज्यातील दहा लाख तोडणी व वाहतूकदारांची फसवणूक केल्याने त्याचा निषेध करतो. आम्ही लवादावर विश्वास ठेवला; पण त्यांनी विश्वासघात केला. आगामी काळात आक्रमकपणे आंदोलन करणार आहोत.- प्रा. डॉ. सुभाष जाधव, सरचिटणीस, ऊसतोडणी व वाहतूक संघटना