'इस्टर्न फ्री वे'ला देणार विलासराव देशमुखांचे नाव; रितेश देशमुखने मानले अजितदादांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 13:04 IST2020-01-15T13:01:51+5:302020-01-15T13:04:21+5:30
मुख्यमंत्रीपदी असताना विलासराव देशमुख यांनी मुंबईच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. तसेच इस्टर्न फ्रि वेला अर्थात पूर्व द्रुतगती मार्गाच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे. त्यामुळे या मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याच्या सूचना अजित पवार यांनी बैठकीत केल्या.

'इस्टर्न फ्री वे'ला देणार विलासराव देशमुखांचे नाव; रितेश देशमुखने मानले अजितदादांचे आभार
मुंबई - बहुचर्चित समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यानंतर मुंबईतील 'इस्टर्न फ्रि वे'ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यानंतर अभिनेता रितेश देशमुख याने अजित पवार यांचे आभार मानले आहे.
मुख्यमंत्रीपदी असताना विलासराव देशमुख यांनी मुंबईच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. तसेच इस्टर्न फ्रि वेला अर्थात पूर्व द्रुतगती मार्गाच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे. त्यामुळे या मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याच्या सूचना अजित पवार यांनी बैठकीत केल्या.
मुंबईतल्या 'इस्टर्न फ्री वे' ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 14, 2020
या संदर्भात अजित पवारांनी ट्विट करत माहिती दिली. अजित पवार यांनी ट्विट करताच अभिनेता रितेश देशमुखने त्यांचे आभार मानले आहे. श्री. विलासराव देशमुखजींनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला. त्याबद्दल मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन
श्री विलासराव देशमुखजींनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल - मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन श्री @AjitPawarSpeaks दादा. Eastern Free Way in Mumbai to be named after #VilasraoDeshmukh - https://t.co/H4HxXiuhL1
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 14, 2020
या बैठकीला वित्त आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.