शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तटबंदीत आंदोलनाची घुसमट!

By admin | Updated: March 20, 2015 01:21 IST

जैतापूर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणा देत गुुरुवारी कुवारबांव येथे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मोर्चाने प्रकल्पाविरोधात हल्लाबोल केला.

रत्नागिरी : जैतापूर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणा देत गुुरुवारी कुवारबांव येथे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मोर्चाने प्रकल्पाविरोधात हल्लाबोल केला. शिष्टमंडळाला प्रकल्पाच्या रत्नागिरी कार्यालयात जाऊही न दिल्यामुळे ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांसह ६१२ आंदोलकांची धरपकड करण्यात आली. त्यांच्यावर कलम ६८ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून कलम ६९ अन्वये सोडून देण्यात आले. मात्र, पोलिसांच्या तटबंदीत या आंदोलनाची पुरती घुसमट झाली. आंदोलकांच्या संख्येच्या दुप्पट पोलीस, अशी स्थिती दिसत होती.गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनाची जोरदार तयारी केली होती. या आंदोलनात गनिमीकावा वापरला जाणार असल्याचीही चर्चा होती. चार वर्षांपूर्वी जैतापूूर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे गुरुवारचे कुवारबांवचे आंदोलन शांततेत व्हावे, कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडू नये, म्हणून पोलीस व जिल्हा प्रशासनाने कुवारबांव परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कुवारबांव ते आरटीओ चौक या १ किलोमीटर रस्त्यावर रिकामी डांबर पिंंपे व बांबू यांचा दुभाजक बनविण्यात आला होता. एका बाजूने मोर्चेकऱ्यांना मार्ग मोकळा ठेवण्यात आला होता. दुसऱ्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू होती. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आंदोलक कुवारबांव येथील डॉ. आंबेडकर भवनाबाहेर रस्त्यावर गोळा होऊ लागले. ११.४५ वाजता आंदोलक मोर्चाद्वारे रस्त्याने चालत अणुऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयाकडे निघाले. त्यांना पोलिसांनी कुुवारबांवमध्येच अडविले. तेथेच १२.१५ वाजता मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार विनायक राऊत, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, मच्छीमार नेते अमजद बोरकर आदी उपस्थित होते. त्यांनी सभेत प्रकल्पाच्या हद्दपारीबाबत जोरदार भाषणे केली. अणुऊर्जा प्रकल्प कार्यालयात जाण्यावरून शासकीय अधिकारी व शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी नेत्यांसह आंदोलकांना पकडून औद्योगिक वसाहतीतील अन्न महामंडळाच्या वखारीत नेण्यात आले. तेथे त्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. (प्रतिनिधी)