शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मापात पाप रोखणा-यांवरच अन्याय!

By admin | Updated: April 7, 2015 04:23 IST

मापात पाप करणाऱ्या दुकानदारांना चाप बसवणाऱ्या वजनेमापे विभागातील निरीक्षकांवरच शासनदरबारी अन्याय होत असल्याची धक्कादायक बाब समोर

चेतन ननावरे, मुंबईमापात पाप करणाऱ्या दुकानदारांना चाप बसवणाऱ्या वजनेमापे विभागातील निरीक्षकांवरच शासनदरबारी अन्याय होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इलेक्ट्रीक वजनकाट्यांची तपासणी करणाऱ्या निरीक्षकांना शासनदरबारी तांत्रिक पदवी असतानाही त्याचा उल्लेख वगळल्याने वर्ग तीन कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी देण्यात येत आहे. तुलनेत गृह, कृषी, अन्न व औषध प्रशासन, जलसंपदा अशा सर्वच विभागांतील समान दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश वर्ग दोनमध्ये करण्यात आला आहे.वर्ग दोन दर्जाचे अधिकार आणि काम करत असतानाही सरकारने निरीक्षकांना वर्ग तीनमध्ये खितपत ठेवल्याचा आरोप निरीक्षक वैधमापनशास्त्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जी.एम. वाघमारे यांनी केला आहे. वाघमारे यांनी सांगितले की, गेल्या कित्येक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मागणी प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. शासनाविरोधात संघटनेने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातही धाव घेतली होती. २६ जून २००९ साली न्यायाधिकरणानेही कर्मचाऱ्यांचा समावेश वर्ग २ मध्ये करण्याचे आदेश देत सरकारविरोधात निर्णय दिला होता. मात्र त्यावेळीही सरकारने आश्वासन देत कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली.याआधी औद्योगिक निरीक्षक (वैध मापन शास्त्र) म्हणून नोंद असलेल्या वैध मापन शास्त्र यंत्रणेतील निरीक्षकांना वर्ग तीन मधील अराजपत्रित तांत्रिक दर्जा प्राप्त होता. तोच दर्जा कृषि विभागातील कार्यदेशक/पर्यवेक्षक, गृह विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक, अन्न व औषध प्रशासनातील अन्न निरीक्षक, जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता, गृह विभागातील पोलीस उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांना होता. कालांतराने या सर्व पदांच्या वेतन श्रेणीत वाढ करण्यात आली. मात्र वजनेमापे विभागातील निरीक्षक शासनदरबारी उपेक्षितच राहिले. याउलट औद्योगिक विभागातून वैध मापन शास्त्र यंत्रणेत समाविष्ट झाल्यानंतर त्यांच्या पदामागील तांत्रिक हा शब्दही वगळण्यात आला. म्हणजेच तांत्रिक शिक्षणाची पदवी असून, तांत्रिक पद्धतीचे काम करूनही वेतन मात्र सर्वसामान्य कारकूनाचे मिळत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.