शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणी व राय न्यायालयीन कोठडीत

By admin | Updated: September 8, 2015 02:13 IST

शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा ड्रायव्हर श्याम रायची वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तसेच इंद्राणीचा दुसरा पती

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा ड्रायव्हर श्याम रायची वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तसेच इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्नाने दिलेल्या माहितीची शाहनिशा करण्यासाठी त्याला कोलकाता येथे नेण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले़या तिन्ही आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी वांद्रे महानगर दंडाधिकारी जी़ आऱ तौर यांच्यासमोर हजर करण्यात आले़ इंद्राणी व रायच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे विशेष सरकारी वकील वैभव बगाडे यांनी न्यायालयासमोर सांगितले. तर, खन्नाने दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्याला सकाळी विमानाने कोलकाता येथे नेण्यात आले.मंगळवारी त्याला परत मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर केले जाईल़ अथवा तेथेच कोलकाता येथील न्यायालयात हजर केले जाईल़ यासाठी त्याच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करावी, अशी मागण अ‍ॅड़ बगाडे यांनी केली़याला खन्नाच्या वकिलाने विरोध केला़ तर न्यायालयाने खन्नाच्या अनुपस्थितीत कोणतेही आदेश जारी करण्यास नकार दिला आणि इंद्राणी व रायची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ इंद्राणीच्या वकील गुंजन मंगला यांनी तिला कारागृहात घरचे जेवण देण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली़ त्यावर येत्या गुरूवारी सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले़इंद्राणी मुखर्जी, श्याम राय यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी संध्याकाळी ७च्या सुमारास खार पोलीस ठाणे गाठले. मारियांसोबत सहआयुक्त (का व सु) देवेन भारतीही होते. मात्र या दोघांआधीच इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी खार पोलीस ठाण्यात उपस्थित होते. दुपारपासून खार पोलीस पीटर यांची चौकशी करीत होते. मरिया आणि भारती यांनी पीटर यांच्याकडे मालमत्तेबाबत चौकशी केल्याचे समजते. इंद्राणी भायखळा कारागृहात : वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या इंद्राणी मुखर्जीला संध्याकाळी भायखळा येथील महिला कारागृहात बंद करण्यात आले. आता जामीन मिळेपर्यंत इंद्राणीला याच कारागृहात दिवस काढावे लागतील. विशेष म्हणजे घरचे जेवण मिळावे या अर्जावर न्यायालय १० सप्टेंबरला निकाल देण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत तिला कारागृहातील अन्य महिला कैदी जे जेवतात त्याच जेवणावर समाधान मानावे लागणार आहे.