शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भावरून महायुतीत तू तू-मै मै

By admin | Updated: May 29, 2015 01:13 IST

स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या मुद्द्यावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घूमजाव केल्याने शिवसेनेने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले.

मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या मुद्द्यावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घूमजाव केल्याने शिवसेनेने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले. त्याचवेळी केंद्रातील भाजपा सरकारकडे बहुमत असल्याने लागलीच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करून टाकवी, अशी मागणी करून रिपाइंचे रामदास आठवले यांनी या वादावर आणखी तेल ओतले.मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शहा यांना स्वतंत्र विदर्भाबाबत विचारले असता त्यांनी असे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे सांगितले. शहा यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली. शहांचे वक्तव्य प्रसिद्ध होताच गडकरींनी थोडी सारवासारव करत शहांच्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे सांगितले. तर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, सेनेचा विरोध असल्यामुळे आम्ही ही मागणी पुढे रेटणार नाही.दुसरीकडे शहा यांच्या भूमिकेचे शिवसेनेने स्वागत केले. गडकरी, फडणवीस व मुनगंटीवार वगैरे नेते निवडणूक प्रचारात वेगळ््या विदर्भाचा मुद्दा मांडत होते. केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करणार असे बोलत होते. पण भाजपाची अशी कोणतीही भूमिका नाही, अशी अमितवाणी झाल्याने तो प्रश्न निकाली निघाल़्याचे शिवसेनेने म्हटले आहे. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी वादात उडी घेतल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याची हीच योग्य संधी असल्याचे मत व्यक्त केले आहे. (विशेष प्रतिनिधी)