शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 01:12 IST

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

पुणे : राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाकडून खासगी व अभिमत विद्यापीठांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे खासगी व अभिमत विद्यापीठांतील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश दिले जाणार आहेत. याबाबत कक्षाकडून खासगी व अभिमतसाठी स्वतंत्रपणे परिपत्रक काढले. मात्र, या दोन्ही परिपत्रकांमुळे विद्यार्थी-पालक व संस्थांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही संस्थांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र लिंक देऊन स्वतंत्र माहिती भरण्यास सांगितली आहे. असे असले तरी स्वतंत्र गुणवत्ता यादीद्वारे प्रवेश होणार की एकच यादी लागणार, याबाबत कुठेही स्पष्ट करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यातच वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांकडून सोमवारी स्पष्ट माहिती मिळत नव्हती. डॉ. शिनगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अभिमत व खासगी संस्थांची स्वतंत्र गुणवत्ता यादी लावणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्र अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी बुधवारी अखेरची मुदत आहे. ही मुदत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह संस्थांकडूनही होत आहे. मात्र, प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही डॉ. शिनगारे यांनी सांगितले.>‘अभिमत’बाबत अद्याप अस्पष्टताअभिमत संस्थेमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असली तरी त्याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. याविषयी बोलताना भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक सावजी म्हणाले, ‘‘अभिमत विद्यापीठांची प्रवेशप्रक्रिया राज्य शासनाकडून राबविण्यास आमचा विरोध नाही. मात्र, काही बाबी अद्याप स्पष्ट करण्यात आलेल्या नाही. विद्यापीठांमध्ये संपूर्ण देशभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे गुणवत्ता यादी जाहीर करताना ती देशपातळीवरील असेल की राज्यापुरती मर्यादित असेल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. अभिमत विद्यापीठांचे शुल्क हे संंबंधित समितीकडून मान्य करून घेण्यात आलेले असते. अभिमत विद्यापीठांच्या विनाअनुदानित महाविद्यालयांना आरक्षणाचा नियम लागू होत नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया राबविताना यांसह सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. याबाबत राज्य शासनाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे डॉ. सावजी यांनी सांगितले.