शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

साखरउतारा वाढल्याने एफआरपी बेस रेट बदलला- केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 2:08 AM

साखर उताऱ्याच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याने उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) ठरविताना आकारण्यात येणाऱ्या मूळ दरात (बेस रेट) बदल केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.

पुणे : साखर उताऱ्याच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याने उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) ठरविताना आकारण्यात येणाऱ्या मूळ दरात (बेस रेट) बदल केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. तसेच शेतकºयांचे हित लक्षात घेऊन साडेनऊ टक्क्यांच्या खाली साखरउतारा असल्यास शेतकºयांना साडेनऊ टक्केवारीनुसारच एफआरपीची रक्कम दिली जाईल, असेही कृषी मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे.केंद्र सरकारने चालू ऊस गाळप हंगामासाठी (२०१८-१९) एफआरपीच्या बेसरेटमध्ये साडेनऊ टक्क्यांवरून दहा टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने दिला आहे. त्या विरोधात खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारने यंदाच्या गाळप हंगामात उसाचे दर प्रतिटन २ हजार ५५० वरून २ हजार ७५० रुपये केले. मात्र अशी वाढ करताना एफआरपी ठरविण्याच्या बेस रेटमधे ९.५ वरून दहा टक्के असा बदल केला. या बदलामुळे शेतकºयांना १३०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे बेसरेटमध्ये कोणत्या आधारावर बदल केला, अशी विचारणा शेट्टी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने स्वाभिमानीने अ‍ॅड. योगेश पांडे, अ‍ॅड. संदीप कोरेगावे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राजू शेट्टी यांच्या पत्रास चार आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश नुकतेच दिले होते. त्यानुसार केंद्रीय कृषी मंत्रालयाने ७ डिसेंबरला शेट्टी यांना एफआरपीच्या बेस रेटबाबत खुलासा करणारे पत्र दिले आहे.साखरउतारा वाढला म्हणून एफआरपीचा बेस रेट साडेनऊवरून दहा टक्के केल्याचे सरकार सांगते. यामुळे तब्बल १३०० कोटी रुपयांचा फटका केवळ महाराष्ट्रातील शेतकºयांना बसेल. तसेच, साडेनऊ टक्क्यांखाली आणि दहा टक्के व त्यावरील साखरउतारा असे गट पाडण्यात आले आहे. पूर्वी एफआरपीची दुहेरी आकारणी होत नव्हती. याशिवाय साखरउतारा वाढला असेल, तर उत्पादनखर्च वाढला नाही का? कायदा सांगतो उत्पादनखर्चावर आधारित एफआरपी असावी. त्याचेदेखील पालन झाल्याचे दिसत नाही. केंद्र सरकारने एफआरपी बेस रेट वाढविण्यासाठी दिलेले कारण अशास्त्रीय आहे. शेतकºयांनी चांगले उत्पादन घेणे त्यामुळे गुन्हा ठरेल. सरकारच्या या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल.- खासदार राजू शेट्टी

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीNarendra Modiनरेंद्र मोदी