शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या मदतीत वाढ

By admin | Updated: February 4, 2015 02:02 IST

राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कुटुंबातील कर्ता असल्यास त्याच्या वारसांना अडीच लाख तर इतर व्यक्तींच्या कुटुंबियांना दीड लाख रूपयांची मदत देण्यात येईल. आजवर ही रक्कम एक लाख होती. मृत जनावरांच्या पशूपालकांना प्रती जनावर २५ हजार रूपये, दोन मध्यम जनावरांसाठी प्रत्येकी १० हजार रूपये, दोन लहान जनावरांसाठी प्रत्येकी पाच हजार रूपये आणि चार लहान जनावरांसाठी प्रत्येकी साडेतीन हजार रूपये या प्रमाणात मदत देण्यात येणार आहे. पूर्णत: उद्ध्वस्त झालेल्या पक्क्या घरासाठी ७० हजार रूपये, पूर्णत: उद्ध्वस्त कच्च्या घरासाठी २५ हजार रूपये, अंशत: (किमान १५ टक्के नुकसान)उद्ध्वस्त घरांसाठी १५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीसाठी कोरडवाहू शेतीपिकांसाठी १० हजार रूपये प्रति हेक्टर, आश्वासित सिंचन क्षेत्राखालील पिकांसाठी १५ हजार रूपये हेक्टरी, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रूपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार आहे. तसेच शेतजमिनीच्या नुकसानीसाठी खरडून गेलेल्या जमिनीसाठी २० हजार रूपये प्रति हेक्टर, वाहून गेलेल्या जमिनीसाठी २५ हजार रूपये २५ हजार रूपये मदत देण्यात येईल. शेतीपिके, फळपिके आणि शेतजमिनीच्या नुकसानी भरपाईची मर्यादा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत राहील. या मदतीशिवाय शेतकऱ्यांना जमीन महसूलात सवलत, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, कर्जावरील व्याज तीन महिन्यांसाठी माफ, तिमाही वीज बिलात प्रशासकीय विभागाने निश्चित केलेल्या कालावधीसाठी माफी, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय शासनाने आधीच घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)च्पिकांच्या नुकसानीसाठी कोरडवाहू शेतीपिकांसाठी १० हजार रूपये प्रति हेक्टर, आश्वासित सिंचन क्षेत्राखालील पिकांसाठी१५ हजार रूपये हेक्टरी, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रूपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार आहे. उद्ध्वस्त घरांसाठी १५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे.मदतीचा प्रकारआधीची नवीन मदतमदत(आकडे रु.मध्ये)मृत व्यक्ती घरातील कर्ता असेल तर१ लाख२.५० लाखइतर व्यक्ती१ लाख१.५० लाखपूर्णत: उद्ध्वस्त घरे५० हजार७० हजारदोन लहान जनावरे दगावल्यास (प्रत्येकी)२५००५०००चार लहान जनावरे दगावल्यास (प्रत्येकी)२५००३५००