शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवा; दुसऱ्या लाटेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 5:31 AM

आराेग्य विभाग : दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रयोगशाळांना आदेश

स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे, सध्या रुग्ण बरे होण्याचा दरही ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र अनलाॅकच्या टप्प्यांनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना कोरोना चाचण्यांच्या क्षमतेत वाढ कऱण्याचे आदेश राज्याच्या आराेग्य विभागाने दिले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने या संदर्भात काढलेल्या विशेष परिपत्रकानुसार, राज्यातील ५०० वैद्यकीय प्रयोगशाळांना कोरोना चाचण्यांच्या क्षमतेत ८० टक्क्यांनी वाढ कऱण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात खासगी व सरकारी अशा दोन्ही प्रयोगशाळांचा समावेश आहे. राज्यात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना चाचण्यांचे ९० हजार हे प्रमाण कमी हाेऊन सप्टेंबर महिन्यात ते जवळपास ५७ हजार ३११ इतके झाले. ऑक्टाेबरमध्ये चाचण्यांचे प्रमाण एक लाखांमागे ६४ हजार इतके होते. परंतु १२ नोव्हेंबरपर्यंत यात घट होऊन ते ५५ ते ५६ हजारांवर आले.खासगी आणि सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळा सध्या क्षमतेपेक्षा केवळ ५० टक्के कोरोना चाचण्या करत आहेत. त्यामुळे या क्षमेतत वाढ करून आरटीपीसीआर वा प्रतिपिंड (अँटिजन) चाचण्यांत वाढ करण्याची सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेण्यावर भरकाेराेना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेण्यावर अधिकाधिक भर देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. लवकर निदान झाल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल आणि त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता धूसर होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस